ज्यांनी काँग्रेसला चले जाव म्हटलं तेच म्हणताहेत, आता राहुलशिवाय पर्याय नाही…

राहुल गांधींइतका प्रामाणिक नेता मी या देशात पाहिला नाही, त्यांच्याकडे असलेली बौद्धीक क्षमता अजून लोकांनी पाहिली नाही.

ज्यांनी काँग्रेसला चले जाव म्हटलं तेच म्हणताहेत, आता राहुलशिवाय पर्याय नाही...
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 5:33 PM

नवी दिल्लीः गेल्या महिनाभरापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) जोरदार सुरू असून ती सध्या कर्नाटकात आहे. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेचं विश्वेषणकरताना अनेक राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अर्थ काढले गेले आहेत. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांच्याएवढा प्रामाणिक नेता मी कधीच पाहिला नसल्याचे सांगत त्यांचा गौरवच केला आहे.

यावेळी योगेंद्र यादव यांना सवाल करण्यात आला की, काही वर्षांपूर्वीपर्यंत तुम्ही काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. आणि आता या यात्रेत सहभागी झाला, त्यामुळे असा काय अचानक तुमच्यामध्ये बदल झाला.

त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, सध्या देश मोठ्या संकटात आहे, त्यामुळे आज देश अशा वळणावर उभा आहे की आणि तीन वर्षांनी देशाचे संविधान राहिल की नाही हे आताच सांगता येणार नाही.

त्यामुळे आता छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. तसेच ते म्हणाले की, मी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी म्हटले होते की काँग्रेस आता बंद करा.

मात्र त्यावेळीही मी राहुल गांधी यांच्याबद्दल बोललो होतो आणि आजही तेच पुन्हा सांगतोय की, राहुल गांधींइतका प्रामाणिक नेता मी या देशात पाहिला नाही, त्यांच्यातील हुशारी, असलेलं शहाणपण अजून या लोकांनी पाहिली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींची प्रतिमा बदलणार का? यावर बोलताना ते म्हणाले की, जो नेता असतो तो आपल्याभोवती आपल्या कामामुळे एक सकारात्मक ऊर्जा गोळा करू शकतो.

राहुल गांधींनीही गेल्या 30 दिवसांमध्ये तेच केले आहे, त्यामुळेच त्यांच्याभोवती सध्या गर्दी आणि लोकांची शक्ती उभा राहत आहे.

राहुल गांधींचे पावसातील भाषण का व्हायरल झाले तर त्यामध्ये सत्यता होती, वास्तव होतं आणि खरेपणा होता म्हणून ते लोकांना बळ देणारं ठरलं आहे.

स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांना विचारण्यात आले की, या भेटीनंतर राहुल गांधी आणि काँग्रेस पुढील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतील का?

त्यावर ते म्हणाले की, 2024 मध्ये विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार यामध्ये मला अजिबात रस नाही. मात्र हे पक्कं आहे की, 2024 ची निवडणूक भाजपसाठी तितकी सोपी नसणार आहे.

भविष्यात भाजपची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कारण विरोधकांनी एकजूट दाखवलीच तर मात्र आगामी निवडणूक भाजपसाठी कठीण आहे.

योगेंद्र यादवांना तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, यामध्ये काहीही लपून छपून केलेलं नाही. आपल्याला कसा भारत पाहिजे याचं सूत्र राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.