देशात पहिल्यांदा कोणी जिंकल्या होत्या 400 जागा, कोण होता तो नेता
भारतात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी यंदा ४०० जागांचे आवाहन केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या नेत्यांना सर्वात आधी जिंकल्या होत्या ४०० हून अधिक जागा. तेव्हा भाजप कुठे होता जाणून घ्या.

Loksabha Election : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ( Loksabha election result ) लागण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. एक्झिट पोल जाहीर झाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार बनणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला 350-400 जागा मिळू शकतात असा अंदाज अनेक सर्व्हेंमधून समोर आला आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारचा नारा दिला होता. एनडीएला ४०० जागा द्या असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर ते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करतील. ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा एनडीएला किती जागा मिळणार याकडे आहे.
भाजपच्या नेतृत्वात एनडीएला ४०० जागा मिळणार नाही याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. पण तुम्हाला माहित आहे की, याआधी ४०० पार करण्याचे लक्ष्य गाठले गेले होते. 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हे लक्ष्य फक्त एकदाच गाठले गेले होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 414 जागा मिळाल्या होत्या
पीएम मोदींचा 400 पारचा नारा
२०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधानपदासाठी भाजपने नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केली तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला नवे वळण मिळाले. गुजरातच्या विकास मॉडेलवर संपूर्ण निवडणूक लढवली गेली. भाजपने केंद्रातून काँग्रेसला हद्दपार केले. अब की बार मोदी सरकारचा नारा दिला. त्यानंतर फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिला आणि आता अब की बार ४०० पारचा नारा भाजपने दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने सलग दुसरा विजय मिळवला. एनडीएला 336 वरून 353 पर्यंत पोहोचली. यावर्षी, पंतप्रधान मोदींनी तिसरी टर्म मिळवून जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी एनडीएला 400 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. देशभरात जावून त्यांनी प्रचार केला. त्यांनी 200 हून अधिक रॅली, रोड शो आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम केले. अयोध्येतील मंदिर असो, पाकिस्तान, कलम 370 अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली.
जेव्हा काँग्रेसने 400 आकडा ओलांडला
NDA 400 जागा जिंकू शकणार की नाही हे तर ४ जून रोजीच कळेल. पण काही वर्षापूर्वी काँग्रेसने हे लक्ष्य गाठले होते. भारतीय निवडणूक इतिहासात हे घडले आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 541 जागांपैकी 414 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला आतापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्यही मिळाले होते. त्यावेळी काँग्रेसला 48.12 टक्के मते मिळाली होती. सीपीआय (एम) दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यांना 22 जागा तर भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या.
एक्झिट पोल काय सांगताय?
शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असं बोललं जात आहे. पण त्यांना ४०० जागा मिळतील की नाही याचा अंदाज दोनच सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
