AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखिलेश यादव नंतर आता काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका?, केले गंभीर आरोप

काँग्रेसच्या नेत्यांनी लसीला परवानगी देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. (congress leader vaccine approval)

अखिलेश यादव नंतर आता काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका?, केले गंभीर आरोप
| Updated on: Jan 04, 2021 | 12:53 PM
Share

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवर शंका उपस्थित केल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी लसीला परवानगी देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. लसीला परवानगी देण्यासाठीची नियमांना बदलण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते शशी थरुर आणि जयराम रमेश यांनी केला आहे. (congress leader raise question on vaccine approval procedure)

काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप काय?

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लसीला मान्यता देण्याचा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याविषयी ट्विट करत सरकारला आपली भूमिक स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. “भारता बायोटेक ही एक उत्तम गुणवत्ता असणारी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. मात्र या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या फेज-3 च्या ट्रायलसाठी प्रक्रिया मूळ नियमांत पदल करण्यात येत आहेत. हे चकित करणारं आहे,” असं माजी मंत्री जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, त्यांनी असं करण्यामागचं नेमकं कारण सांगण्याचं आवाहनही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केलं आहे.

चाचणी आधीच मंजुरी घातक

कोव्हॅक्सीन या लसीला परवानगी देण्यावरुन माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनीदेखील आक्षेप नोंदवला आहे. चाचणी आधीच कोरोना लसीला परवानगी देणं घातक असू शकतं असं त्यांनी म्हटलंय. “कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजून पूर्ण झालेली नाही. प्रक्रियेआधीच मंजुरी मिळणे घातक असू शकतं. हे नेमकं काय चालू आहे, याबाबत आरोग्य मंत्रालयाने आपली भूमिका स्षट करायला हवी,” असं थरुर यांनी म्हटलंय. तसेच, लसीची चाचणी होण्याआधीच तिच्या वापरावर बंदी आणायला हवी, मागणीही थरुर यांनी केलीये.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी या लसी भाजपच्या असून त्या घेणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनतर आता काँग्रेसनेसुद्धा लसींच्या मंजुरी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे.

संबंधित बातम्या :

आधी पंतप्रधान मोदींनीच लस टोचवून घ्यावी, काँग्रेस नेत्याचं आवाहन

मुंबईकरांना दिलासा, मार्चनंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद

आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी

(congress leader raise question on vaccine approval procedure)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.