काँग्रेसचे प्रयत्न निष्पळ; अध्यक्ष निवडीबाबत राहुल गांधी म्हणतात…

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशे त्यातील उत्सुकता अधिकच ताणली जात आहे. कारण राहुल गांधींनी आता अध्यक्षपदासाठी त्यांनी नकार दिला आहे.

काँग्रेसचे प्रयत्न निष्पळ; अध्यक्ष निवडीबाबत राहुल गांधी म्हणतात...
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 7:22 PM

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022) जसजशी जवळ येत आहे. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत प्रचंड हालचाली वाढल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राजी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर जे नेते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सोडून बाहेर येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने त्याचीही गडबड सुरु आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख असली तरी नामनिर्देशनासाठी तरी उमेदवाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे.

त्यामुळे या परिस्थितीतही आणि राज्य समित्यांचा प्रस्ताव येऊनही राहुल गांधी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज देणार नसल्याचेच आता स्पष्ट झाले आहे.

सध्या केरळमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पदयात्रा सुरू आहे. 23 रोजी विश्रांती घेतली जाणार आहे. तर 29 रोजी भारत जोडो यात्रा कर्नाटकात दाखल होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले संपूर्ण लक्ष आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर त्यांनी केंद्रीत केले आहे.

राहुल गांधींनी नकार दिला असून दुसरीकडे मात्र काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह पक्षाचे इतरही काही नेते अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचे दिसत आहे. आणि त्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडूनही निवडणूक लढवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे शशी थरुर यांना प्रतिस्पर्धी असणार आहेत. मात्र ते या पदासाठी तयार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. अशोक गेहलोत यांची पक्षाच्या नव्या अध्यक्षपदी निवड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर गेहलोत यांना अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.