AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं. अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत.

अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष?
| Edited By: | Updated on: Jun 20, 2019 | 12:20 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या शर्यतीत पक्षातील अत्यंत मोठे, ताकदवान आणि अनुभवी नेत्याचं नाव पुढे आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं आहे. लवकरच अशोक गेहलोत यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक गेहलोत हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, तर सोबत आणखी दोन ते तीन कार्यकारी अध्यक्ष असतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याचवेळी, अशोक गेहलोत यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागल्यास राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची नियुक्ती केली जाईल.

कोण आहेत अशोक गहलोत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आतापर्यंत दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. सध्या तिसऱ्यांदा ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गहलोत यांची छाप आहे. अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं. अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत.

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात आलं. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकीत चांगला प्रभाव दाखवून दिला. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर घडवून, काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्बत होत असतानाच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेचा दारुण पराभव झाला. खासदार संख्येची शंभरीही काँग्रेसला गाठता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.

स्वत: राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला काँग्रेसमधून विरोध होत आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपद सांभाळावं, अशी अनेक काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. मात्र, राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.