‘मी पूर्णवेळ अध्यक्ष, माध्यमांद्वारे मत व्यक्त करण्याची गरज नाही’, जी-23 च्या नेत्यांना सोनिया गांधींचं प्रत्युत्तर

30 जूनपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. मात्र, कोरोना महामारीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि आता त्याती रुपरेषा लवकरच सादर केली जाईल, असंही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय.

'मी पूर्णवेळ अध्यक्ष, माध्यमांद्वारे मत व्यक्त करण्याची गरज नाही', जी-23 च्या नेत्यांना सोनिया गांधींचं प्रत्युत्तर
काँग्रेस कार्यकारिणी बैठक
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 1:00 PM

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या ‘जी-23’च्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधलाय. ‘मी पक्षाची स्थायी अध्यक्ष आहोत. माझ्याशी संवाद साधण्यासाठी माध्यमांचा आधार घेण्याची गरज नाही, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्याचबरोबर 30 जूनपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. मात्र, कोरोना महामारीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि आता त्याती रुपरेषा लवकरच सादर केली जाईल, असंही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय. (Sonia Gandhi was angry on G-23 leaders at the Congress executive meeting)

पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आपल्यासमोर अनेक आव्हानं येतील. मात्र, आपण एकजूट आणि शिस्तीने राहिलो, तसंच पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रिय केलं तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण चांगली कामगिरी करु’. तसंच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विघानसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘पक्षाचं हित सर्वोच्च स्थानी असणं गरजेचं’

सोनिया गांधी यांनी संघटनात्मक निवडणुकीचा हवाला देताना म्हटलं की, काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी असं पूर्ण संघटनेला वाटतं. मात्र, त्यासाठी एकी आणि पक्षाचं हित सर्वोच्च स्थानी असणं गरजेचं आहे. त्यावरही आत्मनियंत्रण आणि शिस्तीची गरज आहे. कोरोना संकटामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. तसंच तुम्ही मला बोलण्याची परवानगी दिली तर मी पूर्णकालीन आणि सक्रीय अध्यक्ष आहे. मागील दोन वर्षात अनेक सहकारी आणि खासकर युवक नेत्यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसंच पक्षाची भूमिका लोकांपर्यंत घेऊन गेल्याचंही सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

18 महिन्यानंतर ऑफलाईन बैठक

तब्बल 18 महिन्यानंतर काँग्रेसची पहिली ऑफलाईन बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकांसह विद्यमान राजकीय घडामोडींवरही चर्चा होणरा आहे. या बैठकीत उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेवरही चर्चा होणार आहे. लखीमपूर हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून दोन्ही सरकारांना घेरलं होतं. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या घटनेची निपक्ष चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

राहुल गांधी अध्यक्ष होणार?

आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जी-23 गटाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी केली होती. तसेच पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्याची मागणीही केली होती. निवडणुकीनंतरच अध्यक्ष निवडण्याची मागणीही यावेळी केली जात आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून नव्या अध्यक्षपदावर निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही नेत्यांनी तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे.

इतर बातम्या :

‘वसुली सरकार एकतर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं’, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

VIDEO: मोदींकडून एजन्सींचा गैरवापर नाहीच, तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं; फडणवीसांचा हल्लाबोल

Sonia Gandhi was angry on G-23 leaders at the Congress executive meeting

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.