सोनिया गांधी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; उद्धव ठाकरेंशीही होणार चर्चा

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी येत्या 20 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार आहेत. यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार आहेत. (Sonia Gandhi meets CMs of Congress-led states)

सोनिया गांधी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; उद्धव ठाकरेंशीही होणार चर्चा
sonia gandhi

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी येत्या 20 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार आहेत. यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (Sonia Gandhi meets CMs of Congress-led states)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. विरोधकांची एकता मजबूत आहे. 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहेत. सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यात सामील होणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

कोरोनावर चर्चा

सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून कोरोना परिस्थितीची माहिती घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या अडचणीही त्या जाणून घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कमांडोजचं काम काय?

यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला. (Sonia Gandhi meets CMs of Congress-led states)

 

संबंधित बातम्या:

खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?; संजय राऊत भडकले

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल

(Sonia Gandhi meets CMs of Congress-led states)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI