AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्लिनिकल चाचण्यांमध्ये मोठा खुलासा ! लस घेऊनही 20 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी नाही, लवकरच बूस्टर डोसला परवानगी ?

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेक लोकांच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्या नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे आता बुस्टर डोसची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

क्लिनिकल चाचण्यांमध्ये मोठा खुलासा ! लस घेऊनही 20 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी नाही, लवकरच बूस्टर डोसला परवानगी ?
VACCINATION
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 9:04 PM
Share

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही जवळपास वीस टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्या नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे आता बूस्टर डोसची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या नव्या माहितीमुळे आगामी काळात लवकरच बूस्टर डोसला परवानगी मिळू शकते असा अंदाजही व्यक्त केला जातोय. (corona antibodies not developed in 20 percent people soon booster dose can get permission)

काही लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे 30 ते 40 हजार

याबाबत द न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने सविस्तर माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार भुवनेश्वर येथील एका रिसर्च युनिटमधील जवळपास वीस टक्के सदस्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. असे असले तरी त्यांच्यातील अँटिबॉडीजचे प्रमाण नकारात्मक नोंदवले गेले. ही माहिती समोर आल्यानंतर भुवनेश्वर येथील इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायंन्सचे (ILS) संचालक डॉ. अजय परिदा यांनी अँटिबॉडीजविषयी अधिक माहिती दिली आहे. काही लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे 30 ते 40 हजार आहे. हेच प्रमाण 60 ते 100 च्या दरम्यान असते तर संबंधित व्यक्ती अँटिबॉडी पॉझिटिव्ह आहे, असे आपण म्हणू शकलो असतो. मात्र, ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे तीस ते चाळीस हजारांमध्ये आहे ते अँटिबॉडिज निगेटिव्ह आहेत.

लसीकरण झालेले असताना बुस्टर डोसची गरज

भुवनेश्वर येथील इन्स्टीट्यूट इंडियन ही संस्था SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियम (INSACOG) चा एक भाग आहे. SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियममध्ये (INSACOG) देशभरातील 28 प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूवर अभ्यास केला जातो. या सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूचे जीनोम सिक्वेंसिंग केली जाते. या संस्थेच्या रिपोर्टमध्येही ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांच्या शरीरात अँटिबॉडीची पातळी चार ते सहा महिन्यांनी कमी होत गेल्याचं आढळून आलं, असं सांगण्यात आलंय. ज्या लोकांच्या शरारीत अँटिबॉडीजची संख्या निगेटिव्ह किंवा कमी आहे, त्या लोकांना बूस्टर डोसची गरज आहे, असेही अजय परिदा यांनी सांगितले आहे.

कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीनची परिणामकारकता 70 ते 80 टक्के

अजय परिदा यांनी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या परिणामकारकतेविषयी अधिक माहिती दिली आहे. या दोन्ही लसी 70 ते 80 ट्कके प्रभावी आहेत. या आकडेवारीवरून ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्या शरीरात 20 ते 30 ते तीस टक्के अँटिबॉडी तयार होऊ शकत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने बूस्टर डोसवर सध्यातरी बंदी घातलेली आहे. मात्र असे असले तरी लवकरच बूस्टर डोसला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. देशात आतापर्यंत 73.73 पेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचे डोस मिळालेले आहेत.

इतर बातम्या :

भूपेंद्र पटेलांची मुख्यमंत्रीपदी वर्णी कशी लागली?, दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली, अहमदाबादेत वाचन?; वाचा सविस्तर

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 30 हजारांच्या खाली, कोरोनाबळींतही घट

(corona antibodies not developed in 20 percent people soon booster dose can get permission)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.