AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंताजनक! 170 लाख लोकसंख्या असलेल्या चीनमधील शहरात कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन

चीनमधील 170 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा लॉकडाऊनसारखा कडक निर्णय घेण्याची वेळ ओढावली आहे.

चिंताजनक! 170 लाख लोकसंख्या असलेल्या चीनमधील शहरात कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 13, 2022 | 6:33 PM
Share

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चीनमधील शिंझेन या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन (China Lockdown) करण्यात आला आहे. एकीकडे भारतात कोरोना (India Corona) रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी चीनमध्ये मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलंय. त्या पार्श्वभूमीवर चीनमधील 170 लाख लोकसंख्या असलेल्या शिंझेन या शहरात पुन्हा लॉकडाऊनसारखा कडक निर्णय घेण्याची वेळ ओढावली आहे. शिंझेनआधी चीनच्या वेगवेगळ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढावली आहे. रुग्णसंख्या (Corona Cases) नियंत्रणाबाहेर जात असल्यानं कडक टाळेबंदीशिवाय आता कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यानं स्थानिक प्रशासनाकडून कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. शुक्रवारी चीनच्या चांगचुन शहर आणि आजुबाजूच्या परिसरात कोरोना रुग्णवाढीचा भडका उडाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता.

अनेक शहरांत लॉकडाऊन

आता शिंझेन या 170 लाख लोकसंख्येच्या शहरावरही कोरोनाचं संकट अधिक गडद होऊ लागलंय. त्यामुळे या शहरातली लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसरा चीनमध्ये 397 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यातील 98 रुग्ण एक एकट्या जिलिनमध्ये आढळले होते. चांगचुन शहरात दोन रुग्ण आढळले होते.

दरम्यान, कोरोना महामारीतली ही रुग्णवाढी भारताच्या दृष्टी अतिशय अल्प असली तरिही चीनमधील स्थानिक प्रशासनाचं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकापेक्षा अधिक रुग्ण जिथे सापडतील, तिथं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जातो आहे.

चीनमध्ये लॉकडाऊन करण्यासाठीचे नियम काय?

  1. गरज नसलेल्या वस्तूंची दुकानं आणि व्यवसाय बंद करण्याचे आदेश, दळणवळणही बंद
  2. चीनच्या पूर्वेतील प्रांत शेडोंगमधील 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातली लॉकडाऊन
  3. झिरो टॉलरन्सच्या नीतीमुळे एकपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं प्रशासनाकडून कडक निर्बंध
  4. जिलिन शहरात 93 रुग्णांची भर 11 मार्चला पडली होती, त्यानंतर मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता
  5. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये रुग्णवाढीनं चिंता
  6. सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 100च्या पार गेल्यामुळे खबरदारी
  7. संपूर्ण चीनमध्ये 397 कोरोना रुग्णांची शुक्रवारी भर पडल्याची माहिती

संबंधित बातम्या :

तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय!, एकाच जागेवर जास्त वेळ बसल्यानं आजाराची शक्यता, ‘या’ चुका टाळा…

धक्कादायक: गुटखा तोंडात टाकला, ठसका लागला अन् क्षणात होत्याचं नव्हतं… काय घडलं औरंगाबादेत?

Corona Vaccination: बूस्टर डोसबद्दल WHO म्हणते फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच नव्हे तर ‘हे’ सगळ्यांसाठीच गरजेचे; आरोग्य तज्ञांचे मत काय आहे ते जाणून घ्या

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.