Corona Vaccine : कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई!

देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे.

Corona Vaccine : कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई!
corona-vaccination
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 6:53 PM

मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय. दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कोरोना लसीसंदर्भात अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.(Possibility of action against those who spread rumors about Corona vaccine)

कोरोना लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. तसंच वास्तविक तथ्यांवर आधारीत आणि विश्वसनीय सूचनांचा प्रसार करण्याचा सल्लाही केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन सुरक्षित आणि इम्युनोजेनिक

भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं निर्मिती केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेककडून निर्माण करण्यात आलेली कोव्हॅक्सीन ही लस सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचं अजय भल्ला यांनी सांगितलं आहे.

कोरोना लसीच्या राजकारणावरुन अमित शाहांचं विरोधकांना आव्हान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आसामची राजधानी गुवाहाटी इथं केंद्रीय सशस्त्र पोलीस बल अर्थात CRPFचे जवान आणि त्यांच्या परिवारासाठी आयुष्यान भारत योजनेची सुरुवात केली. त्यावेळी शाह यांनी कोरोना लसीबाबत सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. राजकारणासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या दोन हात करु, असं आव्हान शाह यांनी विरोधकांना दिलं आहे.

‘कोरोना लसीवरुन जे लोक राजकारण करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राजकारण करण्यासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या, दोन हात करु. लोकांच्या आरोग्याशी निगडीत गोष्टी आहेत. आपले शास्त्रज्ञांनी अपार कष्ट करुन लस बनवली आहे. त्यावर का राजकारण करत आहात?’ असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या :
Possibility of action against those who spread rumors about Corona vaccine
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.