AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंजाबची राज्यसभा सीट कितीला विकली होती, सांगू..’ खासदार हरभजन सिंग संतापले

आम आदमी पार्टी फूट पाडून राघव चढ्ढा यांच्या सोबत फुटलेल्या सात राज्य सभा खासदारात हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांना गद्दार म्हणणाऱ्यांना सुनावले आहे.

'पंजाबची राज्यसभा सीट कितीला विकली होती, सांगू..' खासदार हरभजन सिंग संतापले
harbhajan singh
| Updated on: May 22, 2026 | 8:51 PM
Share

राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग यांनी त्यांना सोशल मीडियावर गद्दार बोलल्याने आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की मला गद्दार म्हणणाऱ्यांना मी विचारु इच्छीतो की त्यांनी पंजाबची राज्य सभा सीट किती रुपायांना विकली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका कमेंटला उत्तर देताना ते म्हणाले की त्यांनी सांगावे की किती चढावा दिला होता आणि कोणाच्या वतीने. हरभजन सिंग यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की माझ्या घरासमोर एका राजकीय पक्षाने पुतळा जाळला आणि गद्दार लिहिले. ते म्हणाले या देशाची जनता ठरवेल मला कसे लक्षात ठेवायचे ते…

क्रिकेट जगतातून राजकारण प्रवेश करणारे फिरकी पटू हरभजन सिंग हे काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टी सोडून भाजपात सामील झाले आहेत. हरभजन सिंह यांना आम आदमी पार्टीने राज्यसभेत खासदार केले होते.

येथे पोस्ट वाचा –

हरभजन सिंग यांना याच प्रकरणात एक्सवर देवेंदर यादव नावाच्या एका व्यक्तीने विचारले की ज्या नेत्यावर तुम्ही दिवसरात्र भलेबुरे बोलत आहात.त्यांनी दिलेल्या राज्यसभेच्या सीटचा राजीनामा का दिला नाही. पंजाबच्या ८०० हून जास्त शेतकऱ्यांची मृत्यूला जबाबदार असणाऱ्या भाजपात जाण्यात तुमची अशी कोणती मजबूरी होती ? तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीची किती किंमत लावली तुम्ही ?

येथे पोस्ट वाचा –

हरभजन सिंग यांनी एक्सवर या व्यक्तीला उत्तर देताना लिहिले की , वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक बाबीचे उत्तर दिले जाईल. आणि मी तुमच्या कोणा नेत्याला शिव्या दिलेल्या नाहीत. माझी जिभ मी का घाण करु. मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आपल्या लोकांना विचारावे की पंजाबची राज्य सभा जागा कितीला विकली होती. जर त्यांनी सांगितले नाही तर मी तुम्हाला सांगतो किती चढावा गेला होता आणि कोणाच्या वतीने. आणि कसे कोणा मंत्र्याला संत्री बनवले. पंजाबला लुटण्यासाठी आणि लालाला माल पोहचवण्यासाठी, पंजाबला लुटून खाल्ले.’

अन्य एका युजरला उत्तर देताना हरभजन सिंग यांनी म्हटलंय की,’दीदी राजकीय पक्षाने माझ्या घराबाहेर पुतळा जाळला आणि गद्दार लिहीले. कॉमन लोक तर अशी कामे करत नाहीत. कोणी तरी निर्देश दिले होते पोर्टीच्या लोकांनी हे सर्व काम करण्यासाठी.’

हरभजन सिंग यांनी म्हटले की मला या देशाने खूप प्रेम दिले आहे. २० वर्षे देशाचे नाव खेळाच्या मैदानात गाजवले. आणि तुमच्या लोकांना वाटते कोणता टॅग लावला तर तो कायम राहिल. ही केवळ त्यांचे घटिया विचार दर्शवते. चला या देशाच्या लोकांना ठरवू द्या मला कसे लक्षात ते ठेवणार आहेत. जर कोणता पेड ट्रोलर माझ्या संदर्भात काही बकवास लिहीत आहे तर मी याची पर्वा करत नाही.

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी २०२२ मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. ते पंजाबमधून राज्यसभेत गेले होते. एप्रिल २०२६ मध्ये आप पक्षात फूट पडली तेव्हा ते राघव चढ्ढा, स्वाती मालीवाल असे एकूण ७ राज्यसभा खासदार बाहेर पडले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल