AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरणाचा बदला धरणाने घेणार, भारत चीनला मोठा धडा शिकवणार, अरुणाचलात मोठी तयारी सुरु

एनएचपीसी लिमिटेडने या महत्वाकांक्षी योजनेसाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ₹17,069 कोटी इतका आहे. निविदेनुसार, धरणाचे बांधकाम 91 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, म्हणजेच ते 2031 पर्यंत ते पूर्णपणे कार्यरत होईल असा अंदाज आहे.

धरणाचा बदला धरणाने घेणार, भारत चीनला मोठा धडा शिकवणार, अरुणाचलात मोठी तयारी सुरु
| Updated on: Oct 05, 2025 | 10:22 PM
Share

भारत आणि चीन यांच्यात सीमावादानंतर आता पाण्यावरुनही भविष्यात हातापायी होण्याचे संकेत आहेत. ब्रह्मपूत्र नदीच्या उपनदी सियांग ( तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो ) चीन तब्बल 167 अब्ज डॉलरची यक्सिया हायड्रोपॉवर योजना साकारत आहे. चीनने दावा केला हा जलविद्युत प्रकल्प डाऊन स्ट्रीम देशांना नुकसान पोहचवणार नाही. परंतू भारताला संशय आहे की याचा वॉटर बॉम्ब म्हणून चीन आपल्या विरुद्ध वापर करु शकतो. त्यामुळे भारताने चीनच्या दाव्यांवर भरोसा न ठेवता आता त्यास निपटण्याची तयारी केली आहे.

चीनचा यक्सिया प्रोजेक्ट काय ?

चीन तिबेटवरुन वाहणाऱ्या सियांग नदीवर यक्सिया प्रोजेक्ट राबवत असून या प्रकल्पात पाच कॅस्केड हायड्रोस्टेशन आहेत. हा जगातील सर्वात मोठा आणि महागडा हायड्रोपावर प्रोजेक्ट मानला जात आहे. 167 अब्ज डॉलरमधून तो साकारला आहे. यात जलविद्युत प्रकल्पाची वार्षिक क्षमता 300 अब्ज kWh आहे. चीनच्या प्रसिद्ध थ्री गॉर्जेज डॅमच्या तुलनेत ही तिप्पट आहे. प्रोजेक्टची संरचना मल्टी डॅम सिस्टीम आणि टनलिंग- डायव्हर्सनवर आधारित आहे. याचा आकार आणि विशाल स्टोरेज क्षमता भारत आणि अन्य डाऊन स्ट्रीम देशांसाठी व्यूवहात्मक दृष्ट्या धोक्याचा इशारा आहे.

भारताची चिंता काय?

चीन धरणात पाणी अडवून वा वळवून भारताच्या सखल भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम करु शकतो. मान्सून नंतर कमी पाणी सोडले तर यामुळे भारतात कृषी आणि पिण्याचे पाणी आणि वीजेच्या उत्पन्नाला फटका बसू शकतो अशी भारताला चिंता आहे.

वॉटर बॉम्ब म्हणून वापर : जर चीन अचानक डॅमचे पाणी सोडले तर भारतात फ्लॅश फ्लड ( पुराची ) स्थिती तयार होईल. त्यामुळे लाखो लोकांची हानी होऊ शकते.

पर्यावरणीय आणि सॅडिमेंट प्रभाव : डॅम नदीच्या सॅडिमेंटला ट्रान्सपोर्टला बदलू शकतो. यामुळे नदी चॅनल, मासे पालन, कृषी जमीन आणि पुराचा पॅटर्न बदलू शकतात.ब्रह्मपुत्र सारख्य मोठ्या नदीचा हा प्रभाव बराच काळ राहू शकतो.

सैन्य तणाव : चीन-भारत सीमा वाद आणि योजनांची पारदर्शकता नसल्याने हा प्रकल्प सैन्य आणि व्यूहरचनात्मक तणाव वाढवू शकतो.

भारताची तयारी काय ?

चीनचे अधिकारी आणि मीडिया या प्रकल्पाने डाऊनस्ट्रीमला कोणताही धोका नसल्याचे म्हणत असेल तरी भारत सावध झाला आहे. चीनचा मागचा इतिहास पहाता भारतासाठी चीनवर विसंबून रहाणे धोकादायक आहे. त्यामुळे या धोक्याचा निपटारा करण्यासाठी भारताने अरुणाचल प्रदेशात एका मेगा डॅम प्रोजेक्ट तयारी सुरु केली आहे.

भारताचा मेगा डॅम किती मोठा ?

AFP च्या बातमीनुसार भारताचा प्रस्तावित धरण प्रकल्प 280 मीटर उंच असेल आणि यात सुमारे 9.2 अब्ज क्यूबिक मीटर पाणी साठवले जाईल. याचा अर्थ सुमारे 40 लाख ओलंपिक साईजच्या स्विमींग पुला एवढे पाणी यात असणार आहे. हा प्रकल्प 11,200 ते 11,600 मेगावॅट हायड्रोपॉवर तयार करु शकतो. परंतू वीज निर्मिती याचे मुख्य लक्ष्य नसणार आहे.नॅशनल हायड्रोपॉवर कॉर्पोरेशनच्या इंजिनियर्सच्या(NHPC) मते हा प्रकल्प प्रामुख्याने चीनच्या धरणापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी जल सुरक्षा आणि पूर व्यवस्थापनाच्या उद्देशाने आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.