AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने बदलली पृथ्वीची चाल, नासाचा धक्कादायक खुलासा, काय झाले नेमके ?

चीनच्या हायटेक इंजिनिअरिंगने पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या गतीला देखील फटका बसला आहे.मानवाच्या पावलाने निसर्गाच्या क्रियेवर परिणाम होणारे हे एक महत्वाचे उदाहरण असल्याचे नासाने म्हटले आहे.

चीनने बदलली पृथ्वीची चाल, नासाचा धक्कादायक खुलासा, काय झाले नेमके ?
Three Gorges Dam
| Updated on: Sep 29, 2025 | 6:48 PM
Share

चीनच्या थ्री गॉर्जेस डॅमला ( Three Gorges Dam ) जगातील सर्वात मोठा हायड्रोपॉवर प्रकल्प मानला जात आहे. आता नासाने या धरणाबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे. या संशोधकांनी सांगितले की या धरणासाठी प्रचंड मोठा पाणी साठा केल्याने पृथ्वीचा अक्ष २ सेंटीमीटरने हलला आहे. एवढेच नाही तर पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याच्या गतीत देखील किरकोळ बदल झाला आहे.

नासाच्या मते थ्री गॉर्जेस धरणात अब्जो टन पाण्याचा साठा केलेला आहे. हे पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरण्याच्या ऐवजी एकाच जागी एकत्र साठवल्याने त्याचे मास डिस्ट्रीब्युशन म्हणजे द्रव्यमानाचे वितरण बदलले आहे. याचा थेट परिणाम आता पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर पडला आहे, नासाने सांगितले की पृथ्वीच्या स्वत:च्या अक्षाभोवती फिरताना सुर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत असते. नासाने म्हटले आहे की पृथ्वीच्या परिभ्रमण गतीच्या बदलाने दिवस सुमारे 0.06 मायक्रोसेकंदाने लहान झाला आहे.

कशामुळे बदलली पृथ्वीची चाल ?

थ्री गॉर्जेस डॅम चीनचा एक इंजिनियरिंग चमत्कार मानला जातो. हा प्रकल्प यांग्त्जी नदीवर आहे. हा जगातला सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रीक डॅम आहे. ज्यातून वीज निर्मिती आणि नेव्हीगेशन सुधारणेसाठी याचा वापर होणार आहे. या धरणाची निर्मिती १९९४ रोजी सुरु झाली होती. आणि २०१२ पासून तो पूर्ण रुपाने चालू झाला आहे.हे धरण सँडॉपिंग यिचांग शहराच्या जवळ हुबेई प्रांतात आहे. याची इंजिनिअरिंग समजण्यासाठी संशोधकांनी एक उदाहरण दिले आहे. जसा एखादा फिगर स्केटर आपले हाथ पसरवून हळू फिरतो आणि हात गुंडाळून वेगाने फिरतो. तसेच जेव्हा ( वस्तूमान ) द्रव्यमान घसरते तेव्हा पृथ्वीची परिभ्रमण गती प्रभावित होते. आणि याचमुळे दिवस लहान होत आहे.

ग्रहाच्या भौतिक संचरनेवर परिणाम

चीन या अक्राळविक्राळ थ्री गॉर्जेस डॅमद्वारे इतके पाणी एकाच जागी साचू शकते की त्याने २२,५०० मेगावॅट वीज निर्मिती केली जाऊ शकते. यामुळे चीनची वीजेची गरजच पूर्ण होईल असे नव्हे तर पूर नियंत्रण आणि नेव्हीगेशन देखील चांगले होईल. परंतू आता लक्षात आले की याची शक्ती पृथ्वीसारख्या ग्रहाच्या भौतिक संचरनेवर देखील परिणाम करु शकते. हा बदल सर्वसामान्य जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनात जाणवणारा नाही. परंतू हे दर्शवते की मानवाच्या योजनांमुळे ग्रहाच्या नैसर्गिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.