AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ललित मोदी यांनी भारतातून का पलायन केले ? म्हणाले मला दाऊदने तिनदा…

आयपीएलचे जनक ललित मोदी यांनी दावा केला आहे की आपण कायद्याला घाबरुन भारतातून पळालेलो नाही तर आपल्याला कुख्यात दाऊद इब्राहिमने धमक्या दिल्या होत्या...

ललित मोदी यांनी भारतातून का पलायन केले ? म्हणाले मला दाऊदने तिनदा...
Lalit Modi and Dawood
| Updated on: Jun 02, 2026 | 4:59 PM
Share

इंडियन प्रीमियर लिग ( आयपीएल ) चे संस्थापक ललित मोदी यांनी एक खळबळजनक मुलाखत दिली आहे. त्यांनी या मुलाखतीत आपण २०१० मध्ये भारतातून कायद्याच्या अडचणींमुळे नाही तर आपल्या जीवाला धोका असल्यानेच पलायन केल्याचे म्हटले आहे. ललित मोदी यांनी अँकर करिष्मा मेहता हिला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे. आपण त्या रात्री तातडीने मुंबईहून लंडनला जाणारी फ्लाईट का पकडली ? याची कहाणी सांगितली आहे.

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी दावा केला आहे की त्यांनी साल २०१० मध्ये कायदेशीर प्रकरणांमुळे नव्हे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे भारत सोडला होता. त्यांनी या मुलाखतीत सांगितले की मॅच फिक्सिंगच्या विरोधातील आपल्या कठोर धोरणाने दाऊद आपल्या जीवाच्या मागे लागला होता. ललित मोदी यांनी या प्रकरणात असाही दावा केला आहे की ते पळपूटे नाहीत आणि त्यांच्या विरोधात कोणत्याही कोर्टात केस चालू नाहीए…

त्या रात्री काय झाले ? ललित मोदीने कसा भारत सोडला ?

एंकर करिश्मा यांनी ललित मोदी यांना विचारले की त्या दिवसाबद्दल तुम्ही सांगू शकता का ? ज्या दिवशी तुम्ही भारत सोडला. यावर ललित मोदी यांनी सांगितले की तो दिवस खूपच माझ्यासाठी खूप कठीण दिवस होता. मला आठवतंय त्या दिवशी मी गोव्याला गेलो होतो. तेथे मी माझ्या लिगल टीम सोबत होतो. कारण बीसीसीआयने मला कारण दाखवा नोटीस बजावली होती. माझ्या सोबत गोव्यात २० वकीलांची टीम होती. आम्ही एका पार्क मध्ये गेलो.बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी मला माझे उत्तर ड्राफ्ट करायचे होते. त्यानंतर मला गोव्याहून मुंबईत परतायचे होते. तोपर्यंत दाऊदने मला मारण्याचे तीनदा प्रयत्न केले होते. त्यामुळे माझी सिक्युरिटी तगडी होती. माझ्या सोबत २४ तास ४० ते ५० गार्ड्स मशीनगनसह तैनात असायचे. तेव्हा मला माहिती नव्हते की मला देश सोडावा लागेल, माझा कोणताही प्लान तसा नव्हता. बीसीसीआयला उत्तर फाईल केल्यानंतर मी मुंबईला पोहचलो.

मी पाहिले बाहेर कोणीच नव्हते…

मोदी यांनी सांगितले की, ‘बीसीसीआयला उत्तर ड्राफ्ट केल्यानंतर मी गोव्याहून मुंबईला पोहचलो. तेव्हा सायंकाळचे साडे पाच वाजले होते. सर्वसाधारणपणे माझ्या कार मला घेण्यासाठी थेट एअरक्राफ्टपर्यंत येतात. चारी बाजूंनी पहारा असतो. जेव्हा माझे विमान पोहचले तेव्हा,आम्ही एका रिमोट पार्किंगमध्ये उभे होतो. मी पाहिले बाहेर कोणीच नव्हते…  मी विचारात पडलो, माझे बॉडीगार्ड आणि सुरक्षारक्षक कोठे आहेत ? हत्यारांनी सुसज्ज असलेल्या कार नव्हती. मी सर्वांना फोन लावायला सुरुवात केली. परंतू सर्वांचे फोन स्विच ऑफ होते. तेव्हा माझ्या खाजगी सुरक्षारक्षकाला सांगितले की खाली जाऊ पाहा काय गडबड आहे ? त्याने बाहेर जाऊन चेक केले आणि पुन्हा येऊन मला सांगितले की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हणालो की कुठे ? तेव्हा एअरपोर्टवर एक बॅक गेट असायचे.नंतर आम्ही बाहेर निघालो आणि माझा बॉडीगार्ड म्हणाला बाथरुमला जाऊया.’

फोर सिजन्स हॉटेलपर्यंत मला सुरक्षित पोहचवले

ललित मोदी यांनी पुढे सांगितले की हिमांशु रॉय, जे त्यावेळी पोलीस आयुक्त होते, ते एअरपोर्टवर माझी वाट पहात होते. त्यांनी मला सांगितले की आम्ही आता तुमचे संरक्षण करु नाही शकत. केवळ पुढच्या काही तासांपर्यंत तुमचे संरक्षण करु शकतो. आम्ही एअरपोर्टपासून तुमच्या हॉटेलपर्यंत तुमच्या सुरक्षेची गॅरंटी घेऊ शकतो. मात्र, माझा सल्ला आहे की या नंतर तुम्ही विचार करा पुढे काय करायचे आहे. त्यानंतर मुंबईच्या फोर सिजन्स हॉटेलपर्यंत मला सुरक्षित पोहचवण्यात आले.

मी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला

तेथे हॉटेलवर गेलो तर तेथे माझे कुटुंब होते, संपूर्ण लॉबी लोकांनी भरली होती. माझे स्वत:चे ४० ते ५० बॉडीगार्ड होते. मी अनेक लोकांना कॉल लावले. मी हे सांगणार नाही कोणाला लावले, हे मी माझ्या बायोपिकसाठी राखून ठेवले आहे. मला सांगितले गेले की माझ्या जीवाला भारतात धोका आहे. माझ्याकडे दोन पर्याय होते एक तर गोळी खायची किंवा भारतातून निघायचे. माझ्यावर भारतात कोणतेही प्रकरण सुरु नव्हते, मी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री ब्रिटीश एअरवेजच्या विमानात जाऊन बसलो. कारण माझ्या जीवाला धोका होता. त्यानंतर दीड वर्षांनी भारत सरकारने सांगितले की माझा पासपोर्ट जप्त केला आहे. तेव्हा मी संपूर्ण जग फिरत होतो. त्यामुळे जेव्हा कोणी असे म्हणते की भारतातून पळालेलो आहे. मी असे मानत नाही असेही ललित मोदी यांनी या मुलाखती म्हटले आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली