AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील हवा प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, दृश्यमानता अवघ्या 50 मीटरपर्यंत

दिवाळीच्या काळात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. शहरातील एअर क्वॉलेटी इंडेक्स हा तब्बल 400 वर पोहोचला आहे. ही प्रदूषणाची सर्वाधिक धोकादायक पातळी मानण्यात येते.

दिल्लीतील हवा प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, दृश्यमानता अवघ्या 50 मीटरपर्यंत
Air pollution
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 3:24 PM
Share

नवी दिल्ली – दिवाळीच्या काळात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. शहरातील एअर क्वॉलेटी इंडेक्स हा तब्बल 400 वर पोहोचला आहे. ही प्रदूषणाची सर्वाधिक धोकादायक पातळी मानण्यात येते. दिल्लीतील हवा प्रदूषण इतके वाढले आहे की, शहराच्या अनेक भागातील दृश्यमानता अवघ्या 50 मीटरवर पोहोचली आहे. आणखी दोन दिवस प्रदूषणाची हीच पातळी कायम राहणार असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन दिल्ली प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दृश्यमानता कमी झाल्याने वाहने जपून चालवावेत असे देखील प्रशासनाने सांगितले आहे. एअर क्वॉलेटी इंडेक्स हा साधारणपणे 50 च्या खाली असेल तर ती हवा  प्रदुषणविरहीत असते असे माणण्यात येते. दिवाळीच्या काळात फटाक्यांचे प्रमाण वाढल्याने हवेचा दर्जा घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

फटाक्यांची आतिषबाजी 

भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या दिपोत्सवाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. प्रदूषण वाढल्याने दिल्लीमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात धुके पसरले. धुक्यामुळे शहराच्या अनेक भागातील दृष्यमानता अवघ्या 50 मीटरवर आली आहे. त्यामुळे वाहने जपून चालवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रदूषणाचा परिणाम दिल्लीकरांवर होत असून, वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वासनाचा त्रास, डोळ्यामध्ये जळजळ, डोळ्यातून पाणी येणे, घसा दुखणे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.  याबाबत बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांकडून शेतातील पिकांचे अवषेश जाळले जात आहेत. त्यातच आता दिवाळीमुळे फटाके फोडण्यात आल्याने शहराच्या प्रदूषण पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीतील एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 400 वर पोहोचला आहे. वाढत्या हवा प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा नागरिकांच्या फेफड्यावर होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

नियमांचे उल्लंघन 

दिल्लीमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याचे पाहायला मिळाले. धुक्यामुळे सकाळी उजडल्यानंतर देखील  अंधुक वातावरण होते. दृष्यमानता कमालीची कमी झाली होती. दाट धुके आणि फटाक्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे दिल्लीतील एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 400 वर पोहोचला. दिल्लीमध्ये एकूण 33 हवा गुणवत्ता तपासणी केंद्रे आहेत, यातीस सर्वच केंद्रांनी आपल्या परिसरातील हवेचा दर्जा हा धोकादायक पातळीवर पोहोचल्याची नोंद केली आहे. या बाबबत बोलताना पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले की, दिल्लीमध्ये वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यात भरीसभर म्हणजे, पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी शेतातील अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ते जाळतात त्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा सामना देखील दिल्लीकरांना कारावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने दिल्लीतील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील दृष्यमानता कमालीची खालावली आहे.

प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्याता 

दरम्यान आणखी दोन दिवस दिल्लीतील प्रदूषण याच पातळीवर राहाणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सध्या दिल्लीचा एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 400 पेक्षा जास्त आहे. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये तो 500 पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. साधारणपणे जर एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 0 ते 50 च्या दरम्यान असेल तर ती हवा सर्वोेत्तम मानण्यात येते. एअर क्वॉलेटी इंडेक्स हा 51 ते 100 दरम्यान असेल तर त्या हवेचा दर्जा हा सर्वसाधारण असतो. 101 ते 200 दरम्यान असल्यास हवेचा दर्जा मध्यम असतो. मात्र त्यापेक्षा अधिक वाढल्यास ती हवा मानवासाठी धोकादायक ठरू शकते. अशा वातावरणामध्ये अनेक आजारांची लागण होण्याची शक्याता असते.

संबंधित बातम्या 

येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयकास मंजुरी मिळेल- रूपाली चाकणकर

VIDEO : Ashish Shelar | राज ठाकरेंची भेट फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीच

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.