येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयकास मंजुरी मिळेल- रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलं आणि पक्षाचं चांगलं काम केलं की त्याच फळ मिळतं. महिला आयोगाची जबाबदारी देऊन पक्षानं माझ्या संघटनेचा सन्मान केलाय- रुपाली चाकणकर,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयकास मंजुरी मिळेल- रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 3:36 PM

पुणे- महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राने महिलांविषयक कायम सकारात्मक धोरणे राबवली, ज्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक निश्चितपणे मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला आहे.

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार व पवार कुटुंबियांची बारामतीमध्ये भेट घेतली. त्यावेळी त्याबोलत होत्या.

”राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलं आणि पक्षाचं चांगलं काम केलं की त्याच फळ मिळतं. महिला आयोगाची जबाबदारी देऊन पक्षानं माझ्या संघटनेचा सन्मान केलाय”, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शक्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी चाकणकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहले आहे.

शक्ती कायद्यात ‘या’ तरतुदींचा समावेश असणार

  •  या कायद्यानुसार 21 दिवसात खटल्याचा निकाल लागणार
  •  बलात्काराच्या प्रकणातील आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार
  •  अती दुर्लभ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड
  • ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद
  •  महिलांवरील क्रूर अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंड शिक्षेची तरतूद
  • वय वर्ष 16 पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप
  • सामूहिक बलात्कार – 20 वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप, 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड
  • १६ वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जमठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप, दहा लाख रुपये दंड
  • बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड
  • पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा, सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील
  •  बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड
  •  एसिड हल्ला केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार
  •  एसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षापर्यंत तुरुंगवास
  •  महिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड बसेल.
  •  सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

गोविंदबागेतल्या पाडव्याला अजितदादांची दांडी, राज्यभरात चर्चेला उधाण, शरद पवारांनी खरं कारण सांगितलं!

उद्या भाऊबीज, पंकजाताईंकडून शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात, अजूनतरी नाही पण …

केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Non Stop LIVE Update
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.