AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold smuggling: डोक्याला विग लावून 30 लाखाचं सोनं अबू धाबीहून आणलं; आता सगळं सोनं कस्टमकडे जप्त

आपल्या डोक्याला विग लावून सोने भारतात घेऊन येण्याचा व सोन्यावर असलेला कर चुकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. सोने जप्त करून ते ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याच्याकडे याप्रकरणी चौकशी सुरु असून त्याच्याबरोबरच इतरही माहिती घेण्यात येत आहे.

Gold smuggling: डोक्याला विग लावून 30 लाखाचं सोनं अबू धाबीहून आणलं; आता सगळं सोनं कस्टमकडे जप्त
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 लाखाचे सोने जप्त
| Updated on: Apr 20, 2022 | 10:47 PM
Share

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI)  अबू धाबीहून आलेल्या प्रवाशाकडून 30 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. अबू धाबीहून (Abu Dhabi) आलेल्या या प्रवाशाकडे 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोने (Gold smuggling) सापडले असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवाशाने विग आणि गुदाशयामध्ये 630.45 ग्रॅम सोने लपवून ठेवले होते. त्या व्यक्तीकडे सापडलेल्या सोन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार 30.55 लाख रुपये इतकी आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची आता चौकशी सुरु केली गेली आहे. या प्रकरणात तो एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार त्याच्या सोबत हे कृत्य करत असल्याची चौकशी कस्टमचे अधिकारी करत असून त्या व्यक्तिकडे असणारे सोने ताब्यात घेण्यात आले आहे.

अबू धाबीहून जी व्यक्ती भारतात आली आहे, त्याने आपल्या डोक्याला विग लावून त्यामध्ये सोने लपवून ठेवले होते. परदेशातून भारतात सोने आणत असताना त्यावर एक प्रकारचा विशिष्ट कर लावला जातो. त्यामुळे सोने आणताना आणि तो कर भरावा लागू नये म्हणून अनेक नवनव्या युक्त्या लढवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असतात.

कर चुकवण्याचा प्रयत्न

आजही ज्या व्यक्तीकडून सोने ताब्यात घेण्यात आले आहे, त्याने आपल्या डोक्याला विग लावून सोने भारतात घेऊन येण्याचा व सोन्यावर असलेला कर चुकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. सोने जप्त करून ते ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याच्याकडे याप्रकरणी चौकशी सुरु असून त्याच्याबरोबरच इतरही माहिती घेण्यात येत आहे.

विगवर खर्च किती

अबू धाबीहून सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती होती. यावेळी विमानतळावर सीमाशुल्क विभागाचे जे अधिकारी तैनात होते त्यांनी सांगितले की, अबुधाबीहून नवी दिल्लीत आलेल्या एका प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 3 वर ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकड चौकशी आणि त्याची तपासणी केल्यानंतर 30.55 लाख रुपये किंमतीचे सोने सापडले आहे. हे सोने सुमारे 630.45 ग्रॅम सोने त्याच्या विग आणि गुदाशयात लपवण्यात आले होते. त्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

Kalyan Crime : चोरांकडे सापडले तब्बल 14 मोबाईल, लोकलच्या गर्दीचा फायदा घेत कशी करायचे चोरी?

Daughter Murder: मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यानं बापानं पोटच्या लेकीलाच संपवलं! नांदेडमधील धक्कादायक घटना

Maharashtra IPS Transfer : राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद भारंबे, कृष्ण प्रकाश, दीपक पांडेंचा समावेश

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.