AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast: स्फोटात पहिली मोठी अटक; इको स्पोर्ट्स कारप्रकरणी उमरच्या नातेवाईकाची धरपकड

Delhi Red Fort Blast Big Update: दिल्ली येथील कार स्फोटाचा तपास, केंद्रीय यंत्रणा करत आहेत. हरयाणातील फरीदाबाद येथील लाल इको स्पोर्ट्स कार पार्क करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची मोठी अटक मानण्यात येत आहे.

Delhi Blast: स्फोटात पहिली मोठी अटक; इको स्पोर्ट्स कारप्रकरणी उमरच्या नातेवाईकाची धरपकड
दिल्ली लाल किल्ला स्फोट
| Updated on: Nov 13, 2025 | 2:15 PM
Share

Lal Kila Blast Big Update: फरीदाबाद पोलिसांनी लाल इको स्पोर्ट्स कार ही खांडवली गावात एका ठिकाणी उभी केलेली आढळली. ज्याने ही कार तिथे लावली, त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव फहीम असल्याचे समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फहीम हा उमरचा नातेवाईक आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात उमरने i20 कारचा वापर केला होता. तो पण या कारमध्ये होता. स्फोटात या कारचा वापर केल्यानंतर ही कार कुठून आणि कशी आली याचा तपास करण्यात आला. ही कार हरयाणातील फरीदाबादमध्ये दिसली होती. तर प्रकरणातील लाल इको स्पोर्ट कार गायब असल्याचे समोर आले होते. त्यानंतर दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील सर्व ठिकाणी अलर्ट देण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांच्या तपासात ही कार फरीदाबादजवळच आढळली.

फहीम उमरचा नातेवाईक

उमर हा i20 कार चालवत होता. त्याने लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणला. तोही त्यात ठार झाला. त्याच्या आईच्या डीएनएवरून आणि घटनास्थळावरील हाडावरून, दातावरून त्याची ओळख पटवण्यात आली आहे. लाल इको स्पोर्टसचा मालक हा उमरचा नातेवाईकच असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे नाव फहीम आहे. तो पण या दहशतवादी कटात सहभागी होता का, त्याच्यावर कोणती जबाबदारी होती याचा पोलीस, यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. उमर दिल्लीत आला तेव्हा फहीम हा त्याच्या संपर्कात होता की नाही याची चौकशी करण्यात येत आहे.

तपास यंत्रणांना यश

तपास यंत्रणांनी स्फोटा अगोदर आणि नंतर शिताफीने कारवाई करत डॉक्टरांची डी गँगला अटक केली. त्यांच्याकडून 2900 किलोचे स्फोटक साहित्य जप्त केले. रायफल आणि स्फोट घडवण्यासाठीचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणात उमर याने आत्मघातकी स्फोट घडवून आणला असला तरी देशातील अनेक शहरात 6 डिसेंबर रोजी मोठे स्फोट घडवून आणण्यासाठी ही तयारी सुरु होती, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

त्यापूर्वीच एक मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. 12 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत मोठे काहीतरी घडवण्यात येणार असल्याचा संशय यंत्रणांनी अगोदरच वर्तवला. त्यादृष्टीने दुपारपासूनच लाल किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आणि शोध मोहिम सुरू होती. आपला कट उघड झाला आहे. आपले नावही समोर आले आहे. त्यामुळे गडबडीत उमरने हा स्फोट घडवल्याचे तपासात समोर येत आहे. त्यांचे नेटवर्क जम्मू आणि काश्मीरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. संदीप चक्रवर्ती यांच्या सतर्कतेमुळे उद्धवस्त झाले.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.