AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ अनुभवानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; वेळ पडल्यास प्रतिकारासाठी तयार केल्या स्टीलच्या काठ्या

प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारात 400 पोलीस जखमी झाले होते. समाजकंटकांनी या पोलिसांना रॉड, तलवार आणि तलवारीने मारहाण केली होती. | Delhi police

'त्या' अनुभवानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; वेळ पडल्यास प्रतिकारासाठी तयार केल्या स्टीलच्या काठ्या
शाहदरा जिल्ह्यात पोलिसांनी अशा 50 काठ्या तयार करवून घेतल्याची माहिती आहे.
| Updated on: Feb 01, 2021 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी उफाळलेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दिल्ली पोलिसांनी समाजकंटकांना अद्दल घडवण्यासाठी स्टीलच्या काठ्या तयार करवून घेतल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावेळी आंदोलक पोलिसांच्या नेहमीच्या लाठ्या सहजपणे अंगावर झेलत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता पोलिसांनी खास स्टीलच्या काठ्या तयार करवून घेतल्या आहेत. (Delhi Police will fight sword-bearing farmers with this Special Steel Lathi)

मात्र, दिल्ली पोलिसांनी याबाबत अधिकृत विचारणा केली असता हे वृत्त नाकारले आहे. प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारात 400 पोलीस जखमी झाले होते. समाजकंटकांनी या पोलिसांना रॉड, तलवार आणि तलवारीने मारहाण केली होती.

अलीपूरचे SHO प्रदीप पालीवाल यांच्यावरही तलवारीने हल्ला चढवण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे आता पोलिसांनी अशा हत्यारांपासून वाचण्यासाठी स्टीलच्या काठ्या तयार करवून घेतल्याचे सांगितले जाते. शाहदरा जिल्ह्यात पोलिसांनी अशा 50 काठ्या तयार करवून घेतल्याची माहिती आहे.

पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले होते. आंदोलकांच्या एका गटाने निर्धारित मार्ग सोडून लाल किल्ल्याकडे कूच केले. तेव्हा त्यांना अडवण्यासाठी पोलीस पुढे सरसावले होते.

मात्र, यापैकी काहींनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली होती, लाठीमारही केला होता. मात्र, आंदोलकांची संख्या प्रचंड असल्याने पोलिसांनी माघार घ्यावी लागली होती. अनेक आंदोलक इतके निडरपणे वागत होते की, पोलिसांनी फोडलेली अक्षूधुराची नळकांडी ते हाताने उचलून पुन्हा पोलिसांच्या दिशेने फेकत होते. त्यामुळे दिल्लीच्या आयटीओ आणि लाल किल्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या:

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

Youth Killed in Tractor Rally: ऑस्ट्रेलियात शिक्षण, तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात, हिंसाचारात जीव गमावणाऱ्या युवकाची कहाणी

(Delhi Police will fight sword-bearing farmers with this Special Steel Lathi)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....