एअर टर्ब्युलन्समध्ये सापडले विमान, २२७ प्रवाशांची पाचावर धारण, अखेर नाक तुटले..अन्
गेले काही दिवस राज्यात पावसाने धुमाकुळ सुरु असताना आज राजधानी दिल्लीत पावसाने विमान प्रवाशांच्या हृदयाचे श्वास रोखले गेले. पावसासोबत गारांचा मारा झाल्याने त्यातच एअर टर्ब्युलन्सने विमानातील २२७ प्रवासांचे प्राण कंठात आले, अखेर ...

राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असतानाच आता मान्सून पूर्व पावसाने राजधानी दिल्लीत धुमाकुळ घातला आहे. दिल्ली ते श्रीनगराला उड्डाण करणारे इंडिगोचे विमानाला मोसमी पावसाचा मोठा फटका बसला. या विमानात २२७ प्रवासी असताना अचानक वातावरण बदल होऊन गारांचा मारा सुरु झाला. एअर टर्ब्युलन्समध्ये हे विमान सापडले. त्यामुळे प्रवाशांच्या अक्षरश: पाचावर धारण बसली. या विमानाचे नाकच तुटल्याने या विमानाची श्रीनगर येथे इमर्जन्सी लँडींग करण्यात आली.
इंडिगो फ्लाइट 6E2142 या दिल्ली ते श्रीनगरला जाणाऱ्या विमानाला बर्फाच्या वादळ आणि एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीत या विमानाची श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग झाली. विमानातील सर्व २२७ प्रवासी सुरक्षित असून हादऱ्याने विमानाच्या पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एअरलाइनने या विमानाला AOG घोषीत केले आणि या विमानाला दुरुस्त करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.




एअर ट्रॅफीस कंट्रोलरला सज्ज राहा सांगितले…
या विमानात एकूण २२७ प्रवासी होते.अचानक बदललेल्या खराब हवामानाचा सामना या विमानाला करावा लागल्याने अखेर वैमानिकाने कर्मचाऱ्यांना सावध केले. श्रीनगर विमानतळाच्या एअर ट्रॅफीक कंट्रोलला संदेश पाठवत इमर्जन्सी लँडींगची तयारी करण्यास सांगितले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे २२७ प्रवाशांनी भरलेले हे विमान सायंकाळी ६.३० वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रु मेंबर पूर्णपणे सुरक्षित आहे. जोरदार गारांनी विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.
इंडिगोची गोव्यासाठी सूचना
इंडिगो एअरलाइन्सने गोव्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इशारा दिला आहे. राज्याच पावसाची शक्यता असून सुरू असलेल्या पावसामुळे विमान वाहतूक प्रभावित होऊ शकते, त्यामुळे विमान उड्डाणांना विलंब होऊ शकतो असा सल्ला सावधानतेचा सल्ला इंडिगो कंपनीने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिला आहे.