AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेथे जाण्यासाठी घाबरतात लोक, तेथे आता ड्रोनने डिलिव्हरी होणार, काय आहे इंडिया पोस्टची D+0 योजना?

पोस्ट विभागाला (India Post) दुर्गम भागात आपली सेवा पोहचवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यातून मार्ग काढण्यासाठी आता पोस्ट खात्याने एक नामी शक्कल लढवली आहे.

जेथे जाण्यासाठी घाबरतात लोक, तेथे आता ड्रोनने डिलिव्हरी होणार, काय आहे इंडिया पोस्टची D+0 योजना?
| Updated on: Oct 14, 2025 | 4:03 PM
Share

India Post Drone Delivery : महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम अशा गडचिरोली ( Gadchiroli ) भागात पोहचण्यासाठी पोस्ट खात्याला अनेक काळापासून अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अशा नक्षली भागात पोस्ट खात्याच्या पत्रांची डिलीव्हरी आता ड्रोनने करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या भागात जनतेचा मोठा फायदा होणार आहे.

पोस्ट विभागाने भामरागड, वैरागड आणि सिरोंचा तालुक्यातील २७ दुरस्थ गावामध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण केली आहे. घनदाट जंगले आणि चांगला रस्ता नसल्याने या आदिवासी भागात डाक आणि आवश्यक सामान पोहचवण्यासाठी दोन-दोन दिवस लागत होते. परंतू आता पोस्ट विभागाचे लक्ष्य  D+0 डिलीव्हरी’ म्हणजे त्याच दिवशी सेवा प्रदान करण्याचे आहे.

हा पायलट प्रोजेक्ट केवळ संचार क्रांतीच आणणार असे नव्हे तर दुर्गम क्षेत्रात जीवनाची गती आणि सरकारी सेवांची पोहच निर्णायक रुपाने बदलणार आहे. D+0 डिलिव्हरीचे लक्ष्य आता दुर्गम भागात त्याच दिवशी डिलिव्हरी करण्याचे आहे. या सेवेचे काम पाहणारे अधिकारी ललित बोरकर यांनी सांगितले की ड्रोन डिलीव्हरीने आता या गावापर्यंत मेडिकल किट, सरकारी दस्तावेज, वर्तमान पत्रे आणि अन्य आवश्यक वस्तू देखील पोहचवता येणार आहेत. यामुळे केवल संचार व्यवस्था आमुलाग्र बदलेल असे नव्हे तर दुर्गम भागातील जीवनाचा वेग वाढणार आहे. आणि सरकारी योजना गावागावात पोहचवणे शक्य होणार आहे.

या महत्वाकांक्षी योजनेला याच वर्षी मे महिन्यात हिरवा झेंडा दाखवला होता. त्यावेळी कर्जत ते माथेरान या दरम्यान एका ड्रोन ९ किलो वजनाचे पार्सल केवळ २० मिनिटात यशस्वीपणे पोहचवले होते. रस्ते मार्गाने येथे पोहचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या यशस्वी पायलट ट्रायलनंतर ऑगस्टमध्ये चंद्रपूर पोस्ट खात्याने गडचिरोलीत याची सुरुवात करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर २७ दुर्गम खेड्यांची निवड करण्यात आली. ही ड्रोन सेवा दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुविधाजनक बनवण्यास मदत करणार आहे. ड्रोन क्रांतीने लोकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. गडचिरोळीच्या २७ आदिवासी गावात याचा वापर होणार आहे. पावसाळ्यात अनेदा या भागातील संपर्क तुटतो तेव्हा ही योजना कामी येणार आहे.

Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
Delhi Blast : मोठी अपडेट...एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?
दिल्लीत खळबळ! शहांकडून सर्वात मोठी अपडेट, लालकिल्ला परिसरात घडलं काय?.
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?
राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय?.
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट
रूपाली पाटलांना 'तो' वाद भोवला थेट प्रवक्तेपद गेलं; मिटकरींचा पत्ता कट.
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती
दिल्लीत स्फोट नाही तर दहशतवादी हल्ला? पोलिसांकडून हादरवणारी माहिती.
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्ली स्फोटानं हादरली, काय घडल? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक.
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान
दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान.
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका
रूपाली चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय...अंधारेंची जिव्हारी लागणारी टीका.
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड
अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड.
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?
अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा?.