AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान दरम्यान आज ‘डीजीएमओ’ चर्चा, शस्त्रसंधी तोडली तर जोरदार प्रत्युत्तर, भारताचा कठोर इशारा

Indian Army DGMO: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले.

भारत-पाकिस्तान दरम्यान आज 'डीजीएमओ' चर्चा, शस्त्रसंधी तोडली तर जोरदार प्रत्युत्तर, भारताचा कठोर इशारा
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Follow us
| Updated on: May 12, 2025 | 8:54 AM

Indian Army DGMO: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. सध्या सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना दिली. त्यामध्ये भारतीय सैन्याने आक्रमकपणे करवाई करुन पाकिस्तानला गुडघे टेकवण्यास भाग पाडल्याचे म्हटले. त्यानंतर पाकिस्तानकडूच शस्त्रसंधीची विनंती झाली.

डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्वप्रथम पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी त्यांच्याशी हॉटलाइनवर चर्चा केली होती. त्यानंतर युद्धबंदीबद्दल चर्चा झाली. आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे. त्यानंतर भारत आपली भविष्यातील रणनीती ठरणार आहे.

असा घडला घटनाक्रम

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. भारताने ९ मे रोजी पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ला केला आणि १० मे रोजी जोरदार तोफगोळांचा माराही केला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आणि पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

भारताने स्पष्टपणे सांगितले की ही चर्चा फक्त डीजीएमओंमध्येच होईल. त्यानंतर १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी बोलण्यासाठी वेळ मागितला. दुपारी साडेतीन वाजता भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानी डीजीएमओकडून शस्त्रसंधीची मागणी झाली. भारताचा उद्देश पूर्ण झाला असल्याने भारताने ती मान्य केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची माहिती दिली. या ट्विटनंतर लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन देशाला शस्त्रबंदीची माहिती दिली.

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.