नितीश कुमार यांचे पूत्र निशांत पुन्हा सक्रीय, बिहारच्या सीएम पदाची चर्चा सुरु असताना मीडियाशी साधला संवाद
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये एनडीएला मोठा विजय मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पूत्र निशांत कु्मार यांनी मोठे वक्तव्य समोर आले आहे. निशांत कुमार संपूर्ण निवडणूक मोहिमेत राजकीय व्यासपीठापासून दूर होते. परंतू आता त्यांनी एनडीएला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आपल्या वडीलांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. निशांत यांचे हे वक्तव्य सीएम नितीश कुमार यांच्यासाठी ढाल बनणार की त्यांना प्रोत्साहित करणार ? याकडे लक्ष लागले आहे. भाजपा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करणार की स्वत:चा मुख्यमंत्री नेमणार याचा सस्पेन्स कायम असताना हे वक्तव्य समोर आले आहे.
एनडीएला बिहारमध्ये मोठे बहुमत मिळाले आहे. तर महागठबंधनचा सुपडा साफ झाला आहे. आता नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु आहे. त्यातच नितीश कुमार यांचे पूत्र निशांत आता अचानक सक्रीय झाले आहेत. त्यांनी त्यांचे वडील नितीश कुमार चांगले काम करत असून यापुढेही जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे. त्याचे हे वक्तव्य एक साधारण संदेश आहे की जेडीयू आणि सीएम नितीश कुमार यांच्या भविष्यासाठी मोठे संकेत आहेत याकडे लक्ष लागले आहे.
निशांत कुमारा यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की मी सर्वात आधी बिहारवासियांना धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहे. एनडीएला इतक्या मोठ्या बहुमताने जिंकवण्यासाठी आभारी आहे. आमचे सरकार बनत आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. अपेक्षाहून मोठा विजय आहे. याचे श्रेय जनतेला आहे. २० वर्षे जे काम केले त्याचे हे फळ आहे. वडीलांवर जो जनतेने विश्वास दाखवला आहे, मला आशा आहे की पापा त्या विश्वासावर कायम राहतील आणि यापुढे विकासाचे काम करत राहतील. निशांत यांनी मीडियाच्या सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.
निशांत मीडियासमोर का आले ?
निशांत यांचे वक्तव्य त्यावेळी समोर आले आहे जेव्हा नितीश कुमार सीएम पदावर पुन्हा राहणार का ? आणि त्यांच्या तब्येतीविषयी चर्चा सुरु आहे. बिहार निवडणूक होईपर्यंत निशांत मीडियासमोर आले नाहीत. आणि निशांत इतर राजकीय वारसदारांप्रमाणे राजकीय व्यासपीठावर न येता काय दूर रहात आले असताना त्यांनी अचानक मीडियाशी संवाद साधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ते पेशाने इंजिनियर असून राजकारणात त्यांना रस नसल्याचे त्यांनी म्हटले होते. निशांत यांचे अशा प्रकारे निवडणूक प्रचारात न दिसण्यामुळे ते परिवारवादावरुन टीका टाळू पाहात आहेत असे म्हटले जात आहे. तसेच आपल्या वडीलांची विकास पुरुष म्हणून प्रतिमा जपू पहात आहेत.
