AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुढचं टार्गेट काय? पश्चिम बंगालसह कोणत्या राज्यांवर भाजपचा डोळा?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटच सांगितलं

बिहार येथील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत विजय उत्सव साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केले. बिहारच्या जनतेला आता जंगल राज नको तर विकास हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आता पुढचं टार्गेट काय? पश्चिम बंगालसह कोणत्या राज्यांवर भाजपचा डोळा?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेटच सांगितलं
pm modi after bihar victory
| Updated on: Nov 14, 2025 | 8:38 PM
Share

बिहारच्या निवडणूकीत नितीश कुमार यांच्या मदतीने एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे अलिकडच्या काळात बिहार धरुन भाजपाला सहा राज्यात विजय मिळाला आहे. भाजपा प्रणित एनडीएने बिहारात महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पराभव केला आहे. आता भाजपानचे पुढचे टार्गेट काय असणार याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाकित केले आहेत.

बिहारात भाजपा प्रणित एनडीएला मोठा विजय मिळला आहे. काँग्रेसचा आणि इतर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या दिल्ली कार्यालयात रात्री विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या संबोधनात बिहारच्या जनतेला आता जंगल राज नको तर विकास हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आजचा आपला विजय नव्या प्रवासाची सुरुवात आहे. बिहारने जो विश्वास टाकला, त्यामुळे आमच्या खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे असे मोदी यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षात बिहार अधिक वेगाने पुढे जाईल. बिहारमध्ये नवे उद्योग येतील. बिहारच्या तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळेल यासाठी आम्ही काम करू. बिहारमध्ये गुंतवणूक येईल. त्यातून अधिक नोकऱ्या मिळेल. बिहारमध्ये पर्यटनाचा विस्तार होईल. जगाला बिहारचं नवे सामर्थ्य दिसेल असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

बिहारमध्ये तिर्थस्थानांचा कायापालट होईल. मी आज देश आणि जगातील गुंतवणूकदारांना सांगतो, बिहार तुमच्या स्वागतासाठी तयार आहे.मी देश आणि जगात असलेल्या बिहारच्या मुलांना सांगतो बिहारमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वात चांगली वेळ आहे असे यावेळी मोदी म्हणाले.

भाजपची ताकद ही भाजपचा कार्यकर्ता

बिहारच्या माता, भगिनी, शेतकऱ्यांना सांगतो, तुमचा विश्वास हे माझं जुनं नातं आहे. तुमची आशा आकांक्षा ही माझी प्रेरणा आहे. आपण मिळून एक असा बिहार बनवूया जो समृद्ध आणि विकसित असेल. भाजपची ताकद ही भाजपचा कार्यकर्ता आहे. जेव्हा भाजपचा कर्मठ कार्यकर्ता जेव्हा ठरवतो तेव्हा कोणतंच लक्ष्य अशक्य होत नाही असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

जंगलराज उखडून फेकेल

मोदी पुढे म्हणाले की भारताच्या यशाचा आधार भाजपचा कार्यकर्ताच आहे. आजच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांना केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगाल ओरिसात ही नव्या ऊर्जेने भारावून टाकलं आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ