AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 टक्क्यांच्या त्या फॉर्म्युल्याने NDAची सरशी, तेजस्वींच्या पराभवाने ममता-अख‍िलेश टेन्शनमध्ये

PM Modi 50 Percent Formula: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 50 टक्के मतांच्या टक्केवारीचा फॉर्म्युला पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. बिहारचा हा निकाल केवळ त्या मोहिमेची एक साखळी असून जी भाजपाने सुरु केली आहे. या फॉर्म्युल्याने भाजपाने सहा राज्यात बंपर जागा मिळवल्या आहेत.

50 टक्क्यांच्या त्या फॉर्म्युल्याने NDAची सरशी, तेजस्वींच्या पराभवाने ममता-अख‍िलेश टेन्शनमध्ये
pm modi and amit shah
| Updated on: Nov 14, 2025 | 7:46 PM
Share

भाजपा हा कायम निवडणूक मोडमध्ये असतो असे म्हटले जाते. ही बाब काही प्रमाणात खरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वाक्य बोलतात आणि संपूर्ण ते वाक्य सत्यात येण्यासाठी उतरतो. तेव्हाच बिहार सारखे निकाल येतात. तुम्हाला आठवत असेल १८ जुलै २०२३ चे पीएम मोदी यांचे ते वक्तव्य. ते त्यांनी एनडीएच्या सहकाऱ्याच्या मिटींगमध्ये केले होते. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की आम्हाला ५० टक्के व्होट शेअरचे टार्गेट मिळवायचे आहे. मग हीच गोष्ट त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान निवडणूकांच्या वेळी सांगितली आणि संपूर्ण पक्ष हे पूर्ण करण्याच्या मागे लागला. आणि निकाल सर्वांसमोर आहे. बिहारमध्ये हीच कमाल दिसत आहे. आणि हीच गोष्ट ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांचे टेन्शन वाढवत आहे.

बिहार निवडणूकीत आतापर्यंत निकालाने भाजपाला सुमारे 21%, जेडीयूला सुमारे 19%, एलजेपीला 5% आणि अन्य सहकाऱ्यांना सुमारे 7 टक्के व्होट मिळतील असे दिसत आहे. जर सर्वांना एकत्र केले तर एनडीएचे मत टक्केवारी 50 टक्क्यांना पार करत आहे. एनडीएच्या बंपर विजयाचा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर गेल्या निवडणूकांचे निकाल पाहा…

जेथे 50% व्होट, तेथे बंपर विजय –

1 – महाराष्‍ट्र व‍िधानसभा 2024 निवडणूकीत एनडीएला ( महायुती )49.75% मते मिळाली होते. एनडीएने क्लीन स्वीप करत 230 जागा जिंकल्या होत्या.

2 – द‍िल्‍ली विधानसभा निवडणूकीत भाजपाने 47.15% व्होट घेऊन सर्वांना धक्का दिला. पॉप्युलर मानली जाणारी आम आदमी पार्टीच्यासरकार एका झटक्यात पायउतार व्हावे लागले.

3 – मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणूकीत 48.62% टक्के मते मिळाली आणि भाजपाने सहज विजय मिळवला. भाजपाला 163 जागा मिळाल्या. या निवडणूकीत भाजपाने आपल्या मतांच्या टक्केवारीत 8 टक्के वाढ केली होती.

4 – छत्‍तीसगड विधानसभेत भाजपाचे व्होट शेअर 46.27% राहिला. भाजपाने 54 जागा जिंकल्या. मतांची टक्केवारी आणि जागांचा बाबतीत हा आतापर्यंतचा मोठा विजय आहे.

5 – राजस्‍थान विधानसभा निवडणूकीत भाजपाची मतदानाची टक्केवारी 41.70% राहिली. मतांच्या टक्केवारीत 2.41% वाढ नोंदवली गेली.115 जागासोबत धमाकेदार विजय मिळाला आहे. 2018 भाजपाला 73 जागा होत्या.

…मोठी व्होट बँक तयार केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती आहे की जर 50 मतदान मिळाले तर दोन तृतीयांश जागा आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही मोहिम राबवण्यात कोणताही कसूर ठेवला नाही. बिहार सारखे विविध जाती समुहाचे प्रतिनिधीत्व करणारे पक्षांना एकत्र आणत मोठी व्होट बँक तयार केली. मतांची टक्केवारी वाढली याचा अर्थ केवळ भाजपाचे मते नव्हेत तर महाआघाडीची मतेही स्वत:कडे वळवण्यात यश आले. एनडीए आघाडीने जुने मतदार, नवीन मतदार आणि लाभार्थ्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. तरुण, महिला, ग्रामीण मतदारांवर फोकस वाढवले. राज्यस्तरीय मोहिमेत बूथ स्तरिय मॅपिंग, सोशल मीडिया प्रचार आणि योजनांची लिस्टींग केली. यासाठी राजकीय परिवर्तनाचे एक मॉडलच्या रुपात स्वीकारले आणि निकाल तुमच्या समोर आहेत.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.