AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election 2025: लालूंसारखेच तेजस्वींचे हाल, नितीश कुमार आणि भाजपाने 2010 चा कित्ता गिरवला

बिहार विधानसभा निवडणूकीत - 2025 मध्ये एनडीए बंपर विजयाच्या दिशेने आहे. आणि महाआघाडीचा सूपडा साफ झाला आहे.यामुळे साल 2010 च्या विधानसभा निवडणूकांची पुनरावृत्ती झाली आहे. तेव्हा एनडीएने 206 विक्रमी जागा जिंकल्या होत्या.

Bihar Election 2025: लालूंसारखेच तेजस्वींचे हाल, नितीश कुमार आणि भाजपाने 2010 चा कित्ता गिरवला
Tejashwi Yadav, Lalu Yadav and Nitish Kumar
| Updated on: Nov 14, 2025 | 3:50 PM
Share

बिहारच्या विधानसभा निवडणूकाचे निकाल येत आहेत. निवडणूक निकालांचा कल आणि आलेले निकाल पहाता एनडीएचा मोठा विजय होत आहे. राज्यातील २४३ विधानसभांच्या जागांवर १९०-१९९ जागांवर पुढे आहेत. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीने आतापर्यंत ५० चा आकडाही पार केलेला नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयाने पुन्हा एकदा साल २०१० च्या विधानसभेच्या निकालांची आठवण करुन दिली आहे. या निवडणूकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू यांनी केवळ कमालच केली नव्हती तर विरोधकांना मोठा झटका दिला आहे.

साल २०१० मध्ये बिहारच्या राजकारण लालू यादव सक्रीय होते. तेजस्वी यादव त्याकाळी राजकारणाची कदाचित बाराखडी शिकत होते. सध्या लालू यादव वय आणि विविध आरोप आणि शिक्षेमुळे राजकारणापासून दूर आहेत. त्याचे राजकारण आता त्यांच्या घरापर्यंत मर्यादित झाले आहे. लालू पक्षाचे प्रमुख असले तर सध्या तिकीट वाटपासह राजकीय जबाबदारी तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे. एक दोन प्रचारसभा वगळता लालू यादव प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकांचे संपूर्ण नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे होते. परंतू निकाल साल २०१० ची आठवण करुण देणारे आहे.

२०१० मध्ये काय होती स्थिती ?

बिहारच्या साल २०१० च्या विधानसभा निवडणूकांवर लक्ष घातले तर तेव्हा नितीश कुमार यांची जेडीयू एनडीएचा भाग होती. तेव्हा जागा वाटपाच्या वाटणीनुसार जेडीयू १४१ वर निवडणूक लढवली होती. तर भाजपाने १०२ जागी मैदानात उतरली होती. या निवडणूकीत बिहार भाजपाच्या वतीने सुशील कुमार मोदी ओळखीचा चेहरा होते. आता मात्र, त्यांचे निधन झाले आहे.

लालू प्रसाद यादव यांची आरजेडी १६८ जागांवर आणि राम विलास पासवान यांची एलजेपी ७५ जागांवर निवडणूकीला उतरली होती. तर काँग्रेसने एकट्याच्या बळावर राज्याच्या २४३ जागांवर उमेदवार उतरवले होते. या निवडणूकीत महाआघाडी नव्हती. आघाडी होती परंतू ती केवळ आरजेडी आणि एलजेपी दरम्यान होती. तेव्हा एलजेपीचे प्रमुख राम विलास पासवान होते आणि त्यावेळी त्यांना लालूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

एनडीए विक्रमी २०६ जागांनी जिंकली

बिहार विधानसभा २०१० निवडणूक निकालात एनडीएने विक्रमी २०६ जागा जिंकण्यात यश मिळवले होते. तर विरोधी आरजेडी, एलजेपी आणि काँग्रेस यांना केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूकीत जेडीयू ११५ आणि भाजपा ९१ जागा जिंकण्यात यशस्वी झाली. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या वतीने आरजेडी २२, एलजेपी ३ आणि काँग्रेसला ४ जागा जिंकल्या होत्या.अन्य पक्षात सीपीआय-१, आयएनडी -६ आणि जेएमएम -१ जागा जिंकली होती. अशा प्रकारे २०१० च्या निवडणूकात एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला होता. तर विरोधी गटांना ५० चा आकडाही पार करता आला नाही. याच प्रकारची स्थिती यंदाही पाहायला मिळत आहे.

२००५ च्या जेडीयूला २७ जागांचा फायदा

फायदा आणि नुकसानीचा विषय करता २००५ च्या निवडणूकीच्या तुलनेत २०१० मध्ये जेडीयूला २७ जागांचा फायदा झाला होता. तर भाजपा ३६ जास्त जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी गटाने तेव्हा ३२ जागांचे नुकसान झाले होते. जेडीयूच्या मतांची टक्केवारी २.१२ चक्के उसळी पाहायला मिळाली होती. याच प्रकारे भाजपाची मत टक्केवारी देखील ०.८४ टक्के वाढली होती. दुसरीकडे आरजेडीला ४.३६ टक्के मतांचे नुकसान उचलावे लागले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.