JDU उमेदवार अनंत सिंह-सूरजभान यांची मेजवाणीची तयारी, तर RJD नेत्याची नेपाळ करण्याची धमकी
बिहारच्या विधानसभा निवडणूकाचा निकाल उद्या 14 नोव्हेंबरला असला तरी आधीच जेडीयूने पार्टीची तयारी केली आहे. आरजेडीचे उमेदवार सुनील सिंह यांनी मतमोजणीत काही घोटाळा केला तर नेपाळ करु असे त्यांनी म्हटले आहे.

बिहार निवडणूकांचा निकाल उद्या 14 नोव्हेंबर रोजी लागत आहे, त्यासाठी अवघे काही तासांत सस्पेन्स संपणार आहे. आता उद्याच्या खास दिवशी अनंत सिंह यांच्यानंतर आता सुरजभान सिंह यांच्या घरीही विजयाची तयारी सुरु आहे. येथे विजय साजरा करण्यासाठी मिठाई तयार करण्याचे काम सुरु आहे. पाटणा येथील निवासस्थानी समर्थकांचा गोतावळा जमला आहे. येथे मोठे तंबू उभारले आहेत. खुर्च्या लावल्या जात आहेत. हजारो लोकांना कोणतीही अडचण नको म्हणून खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था केली जात आहे.
आरजेडी नेत्याने केले सावधान
तर दुसरीकडे राजेडी नेते सुनील सिंह यांनी सरकारवर आरोप लावला आहे. त्यांनी म्हटले आहे जे तुम्ही 2020 मध्ये केले, चार-चार तास मतमोजणी थांबवली.यासंदर्भात चार तास कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यांनी सांगितले की हेच काम जर यावेळी देखील केले तर आमचा उमेदवार येईल, वा जो रिटर्निंग ऑफीसर असेल तो बाहेर येईल. मी सर्वांना उघडपणे सावधान करत आहे. संपूर्ण जनता रस्त्यावर येईल आणि ते दृश्य पाहायला मिळेल जे तुम्हाला नेपाळमध्ये दिसले होते.
जनतेला संशय
आरजेडी नेत्याने सांगितले की संपूर्ण जनता या बाबीने संशियत आहे की हे लोक किती बेईमान आहेत. निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर बट्टा लागला आहे. जेवढे निवडणूकीतले रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांची पोस्टींग कोणत्या प्रकारे झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेला संशय आहे. हे लोक काही ना काही बेईमानी करतील तर नेपाळचे दृश्य भारतात दिसायला लागेल.
महा मेजवाणीची तयारी
मोकामा सीटचे जेडीयूचे उमेदवार अनंत सिंह यांनी निकाल येण्याआधीच रसगुल्ले तयार करण्याची तयारी केली आहे. यावेळी निवडणूकीत जास्त चर्चेत असलेले अनंत सिंह यांचा इतका कॉन्फीडन्स इतका हाय आहे की महा मेजवाणीची तयारी सुरु आहे. यासाठी त्यांनी पोस्टरही जारी केले आहे. ही मेजवाणी पाटणाच्या मॉल रोड येथील घरात आयोजित केली आहे. ज्याचा पत्ता त्यांनी पोस्टरवर दिला आहे. सुरजभान आणि अनंत सिंह दोघेही विजयाच्या तयारीला लागले आहेत.
