AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला पण आहे का ही सवय? तर मग साप चावण्याचा धोका 50 टक्के अधिक वाढतो, ही चूक कधीही करू नका

साप हे कधीही स्वत:हून आपल्याला चावत नाहीत, मात्र त्यांना जर तुमचा धोका जाणवला किंवा तुम्ही बेसावध असाल तर तुम्हाला संर्पदंश होऊ शकतो, आपल्या काही सवयींमुळे देखील साप आपल्याला चावू शकतो.

तुम्हाला पण आहे का ही सवय? तर मग साप चावण्याचा धोका 50 टक्के अधिक वाढतो, ही चूक कधीही करू नका
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 9:53 PM
Share

सापांबद्दल जाणून घेण्याची अनेकांच्या मनात उत्सुकता असते, जसं की कोणात साप विषारी असतो? कोणता साप बिनविषारी असतो? वेगवेगळ्या सापांच्या विषाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो. विषारी आणि बनिविषारी साप कसे ओळखायचे? असे एक न अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात आणि या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असते. साप चावण्याचं किंवा ज्याला आपण सर्पदंश म्हणतो ते होण्याचं प्रमाण दोन ऋतूमध्ये सर्वाधिक असतं एक म्हणजे पावसाळा आणि दुसरा ऋतू म्हणजे उन्हाळा, त्यामुळे या काळात आपण सावध राहिलं पाहिजे.  भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळतात, मात्र त्यातील अगदी काही थोडेच साप हे विषारी असतात.

परंतु साप चावल्यानंतर आपण अनेकदा खूप जास्त घाबरून जातो. त्यामुळे साप बिनविषारी असला तरी देखील त्या तणावाचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. कधी-कधी तणाव एवढा वाढतो की भीतीमुळे देखील आपला मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साप चावला तर घाबरून जाऊ नका, तातडीने रुग्णाला डॉक्टरची मदत मिळून द्या.  साप चावल्यानंतर इतर ठिकाणी कुठेही वेळ वाया घालू नका, ज्या वक्तीला साप चावला आहे, त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करा. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला कधीही मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते या सापाला रेस्क्यू करतील.

अनेकदा असं होतं की आपल्याच सवयीमुळे आपल्याला साप चावण्याचा धोका वाढतो. जसं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाला तुमचे घराच्या बाहेर ठेवलेले बूट हे लपण्यासाठी अधिक सुरक्षित जागा वाटतात. त्यामुळे बुटातून साप बाहेर निघण्याच्या अनेक घटना घडत असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे तो स्वत:चं टेंपरेचर स्वत: नियंत्रित करू शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये अति थंडी किंवा अति उन्हामध्ये त्याला तुमच्या बुटामध्ये नौसर्गिकरित्याआवश्यक असलेलं वातावरण निर्माण होतं. बुटामध्ये एक तर अंधार असतो, आणि वातावरण देखील संतुलीत असतं. योग्य वातावरण आणि लपण्यासाठी अंधार या दोन गोष्टी जूळून आल्यामुळे साप तुमच्या बुटात घुसून बसतो.

अनेकांना सवय असते ते काही न पहाता तसाच बूट पायात घालतात, त्यात जर साप असेल तर तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो, त्यामुळे बूट घालण्यापूर्वी नेहमी एकदा तो स्वच्छ करून घ्यावा आणि मगच तो घालावा, त्यामुळे अशा धोक्यांपासून तुमचा बचाव होऊ शकतो, तुम्ही सुरक्षित राहू शकता.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल