डोनाल्ड ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा, चीन आता मोठ्या संकटात, संपूर्ण जगाचं अमेरिकेकडं लक्ष
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर आता अधिक आक्रमक होताना दिसत आहे, त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे चीन मोठ्या संकटात सापडले आहे.

अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर आता अधिक आक्रमक होताना दिसत आहे, चीनने अचानक अमेरिकेला करण्यात येणारी रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवली याचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेला बसला, कारण अमेरिका रेअर अर्थ मिनिरल्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे, हा अमेरिकेसाठी चीनने दिलेला सर्वात मोठा झटका मानला जात होता. चीन एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यानंतर काही तांसामध्येच चीनेने आणखी एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे चीन हा अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदी दार देश होता. चीनने अमेरिकेतून होणारी सोयाबीनची आयात अचानक थांबवली, त्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भूकंप आला आहे, तेथील शेतकरी संकटात सापडले आहेत.
दरम्यान चीनने आधी रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवली, त्यानंतर सोयाबीनची खरेदी देखील अचानक थांबवण्याचा निर्णय घेतला,चीनच्या या धोरणामुळे अमेरिकेकडेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले त्यानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला, त्यांनी चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली, येत्या एक नोव्हेंबरपासून आता चीनी वस्तुंवर अमेरिकेत 100 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे चीन मोठ्या संकटात सापडले असून, देशात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी आता थेट चीनला धमकी दिली आहे, जर चीनने सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू केली नाही तर आम्ही चीनसोबत असलेल्या खाद्य तेलाचा व्यापार बंद करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, चीन जाणून बुजून आमच्याकडून सोयाबीन खरेदी करत नाहीये, त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत, हा एक आर्थिक आणि व्यापारी शत्रूत्व वाढवण्याचा प्रकार आहे, आम्ही देखील आता चीनकडून खरेदी करण्यात येणाऱ्या खाद्य तेलाची आयात बंद कण्याचा निर्णय घेणार आहोत, त्यावर विचार सुरू आहे. दरम्यान अमेरिकेनं जर चीनकडून खाद्य तेलाची खरेदी बंद केली तर त्याचा चीनला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण चीनमध्ये उत्पादीत होणारं जवळपास 43 टक्के खाद्य तेलाची अमेरिकेकडून खरेदी केली जाते.
