डोनाल्ड ट्रम्प आता थेट युद्धाच्या तयारीत? जगाला हादरून सोडणारे दोन सर्वात मोठे निर्णय, आता पुढे काय होणार?
अमेरिकेमध्ये काही तरी मोठं घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच दोन मोठे निर्णय घेतले आहेत, यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष हे अमेरिकेकडे लागलं आहे.

दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहेत. भारतावर लावण्यात आलेला 50 टक्के टॅरिफ, चीनसोबत सुरू केलेलं व्यापार युद्ध, रशियन तेल कंपन्यांवर लावण्यात आलेले प्रतिबंध, हे सर्व एकीकडे सुरू असतानाच आता अमेरिकेमध्ये काही तरी मोठं सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी असे दोन निर्णय घेतले आहेत, त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अमेरिकेमध्ये एखादं मोठं सीक्रेट मिशन सुरू आहे. सध्या जगभरात सर्वत्र युद्धाचं वातावरण आहे, तसेच अमेरिका आणि चीनमध्ये सुपर पावर कोण? याची स्पर्धा सुरू असतानाच ही बातमी समोर आल्यानं संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये सध्या सर्वात जास्त शक्तिशाली शस्त्र, आस्त्र बनवण्याची स्पर्धा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. सध्या दोन्ही देशांकडून असं घातक हायपरसॉनिक शस्त्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्याचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा देखील अधिक असेल, त्यामुळे या शस्त्राला ट्रॅक करणं अशक्य होणार आहे, यामुळे अमेरिकेची पावर प्रचंड प्रमाणात वाढू शकते.
दरम्यान सध्या संरक्षण क्षेत्रातील कॅस्टेलियन नावाच्या एका अमेरिकन स्टार्टअपने सर्व जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. या स्टार्टअपसोबत अमेरिकेच्या सरकारने एक करार केला आहे.ब्लॅकबियर्ड हायपरसोनिक स्ट्राइक शस्त्राला अमेरिकेच्या सैन्यामध्ये समाविष्ठ करण्याचा करार या कंपनीसोबत करण्यात आला आहे, दरम्यान या कंपनीने उघडपणे असा दावा केला आहे की, जर असं शस्त्र विकसीत झालं तर अमेरिकेचं सैन्य अपराजीत होईल, कोणीही या सैन्याचा पराभव करू शकरणार नाही.
तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे त्यांनी डिफेन्स कंपन्यांना शस्त्रसाठा आणि मिसाईलची संख्या आहे त्यापेक्षा चरपटीने अधिक वाढवण्याचा आदेश दिला आहे. एकीकडे अमेरिका आणि रशियामधील तणाव वाढलेला असतानाच ट्रम्प यांनी घेतलेले हे दोन निर्णय खळबळ उडून देणारे आहेत.
