AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अति केल्यावर माती होणारच, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, शेवटी तो आदेश आलाच, अमेरिकेला मोजावी लागणार मोठी किंमत

मोठी बातमी समोर येत आहे, संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. एका निर्णयामुळे संपूर्ण चित्रच बदललं आहे.

अति केल्यावर माती होणारच, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, शेवटी तो आदेश आलाच, अमेरिकेला मोजावी लागणार मोठी किंमत
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 4:06 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे संपूर्ण जग वेठीस धरलं गेलं आहे. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. जो देश अमेरिकेच्या धोरणांविरोधात जाईल, त्या देशावर ते थेट 25 टक्के 35 टक्के 50 टक्के असा कितीही टक्के टॅरिफ लावायचे. अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेनं अनेक देशांची नाराजी ओढून घेतली, तसेच यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला देखील धक्का बसला, दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीविरोधात अमेरिकेच्या कोर्टात दाद मागण्यात आली होती, या प्रकरणात ट्रम्प यांना कोर्टानं मोठा झटका दिला होता. अशापद्धतीने टॅरिफ लावणं हे अवैध असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध सुरू केलं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं. दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केल्यानं ही सामुद्रधुनी व्यापारी जाहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाची सध्या संपूर्ण जगाला फार मोठी किंमत मोजावी लागत असून, भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र आता अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.

अमेरिकेच्या न्यायालयाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी अमेरिकेच्या व्यापारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ज्यामध्ये राष्ट्रपतींकडून लावण्यात आलेलं 10 टक्के जागतिक आयात शुल्क अवैध असल्याचं म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने हा 10 टक्के टॅरिफ देखील रद्द केला आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांना दिलेला हा दुसरा मोठा झटका आहे.

यासाठी न्यायालयाने 1970 च्या व्यापारी कायद्याचा संदर्भ दिला आहे. या कायद्यानुसार हा टॅरिफ अवैध ठरतो असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने केवळ हा टॅरिफ अवैधच ठरवला नाहीये तर ज्यांच्याकडून टॅरिफ वसूल करण्यात आला होता, त्या सर्वांचे पैसे वापस देण्यात यावेत, पुढील पाच दिवसांमध्ये या आदेशाचे पालन करावे असं न्यायलयानं म्हटलं आहे.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?