AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, रात्रीच्या वेळी मुलींना…

Durgapur Gangrape: पश्चिम बंगाल पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाजवळ या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. अशातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, रात्रीच्या वेळी मुलींना...
CM Mamta on Gang Rape
| Updated on: Oct 12, 2025 | 4:58 PM
Share

पश्चिम बंगाल पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. आणखी एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला आहे. दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाजवळ या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. संपूर्ण देशात या घटनेची चर्चा रंगली आहे. अशातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर (कॉलेजला) जाऊ देऊ नये. त्यांनी स्वतःचे रक्षणही केले पाहिजे. हा जंगलाचा परिसर आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही. जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल.’ मात्र आता या विधानामुळे गोंधळ उडाला आहे.

विरोधी पक्षांनी ममता यांच्या महिलांबाबतच्या या पक्षपातीपणावर आणि प्रशासनाच्या अपशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बॅनर्जी यांनी पुढे बोलताना असेही म्हटले की, या प्रकरणात सरकारला ओढणे चुकीचे आहे, कारण मुलीची सुरक्षा सुनिश्चित करणे ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी आहे.’ मात्र बॅनर्जी यांनी आरोपींना सोडणार नाही असं आश्वासनही दिले आहे.

4 आरोपींना अटक

बलात्काराच्या या घटनेनंतर पोलीसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी स्थानिक रहिवासी आहेत. त्यांची ओळख अपू बौरी (21), फिरदौस शेख (23), शेख रियाझुद्दीन (31) आणि शेख सोफिकूल अशी पटली आहे. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित मुलगी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे. ती मित्रासह जेवायला बाहेर गेली होती, त्याचवेळी आणखी दोन-तीन पुरूष आले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेवेळी पीडितेचा मित्र तिला तिथेच सोडून पळून गेला.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.