नवी दिल्लीः खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती मधल्या काळात प्रचंड वाढल्या होत्या, त्याचा जनसामान्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना दोन दिवसापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज तात्काळ खाद्य तेल असोसिएशनला केंद्र सरकारकडून (Central Government) निर्देश देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात उत्पादनांच्या किंमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.