तरुणांनो विकसित भारत बिल्डथॉन मोहिमेत सहभागी व्हा, शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील तरुणांना विकसित भारत बिल्डथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे बिल्डथॉनमध्ये 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला चालना देणारा आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील तरुणांना विकसित भारत बिल्डथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे बिल्डथॉनमध्ये 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला चालना देणारा आहे. याद्वारे तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय भाषांच्या प्रचारावर भर देण्यात आला आहे. हे पाऊल केवळ भाषिक आणि प्रादेशिक सीमा ओलांडून जलद आणि व्यापक संवाद घडवून आणण्याचे काम करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धर्मेंद्र प्रधान यांनी तरुणांना या बिल्डथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी विविध भाषांमधून आवाहन केले आहे. यात हिंदी, ओडिया, गुजराती, मराठी, आसामी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या 10 भारतीय भाषांचा समावेश आहे. हे सर्व व्हिडिओ एआय-द्वारे ट्रान्सलेट करण्यात आलेले आहेत. माहिती विविध भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी एआयचा वापर करून, सरकार भाषिक विविधता आणि शिक्षणातील तांत्रिक प्रगतीसाठी हा उपक्रम राबवत आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, नमस्कार माझ्या तरुण मित्रांनो. आपल्या देशात शालेय वर्ग बदलाच्या प्रयोगशाळा बनत आहेत. इथे कल्पना इनोव्हेशन बनतात आणि इनोव्हेशन राष्ट्र निर्माणात बदलते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, युवा शक्ती विकसित भारताचा आवाज आहे. जेव्हा 13 ऑक्टोबरला तरूण वर्ग सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत विकसित भारत बिल्डथॉन 2025 मध्ये एकत्र येईल तेव्हा हा आवाज देशभरात घुमेल.
दुनिया को भारत की युवा शक्ति की ताकत दिखा दें, जो राष्ट्र के लिए इनोवेशन कर रही है और दुनिया को प्रेरित कर रही हैhttps://t.co/h0KL5bojxx पर आज ही, रजिस्टर करें… pic.twitter.com/SQwukDVgcG
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 11, 2025
हा सर्जनशीलता आणि आत्मविश्वास याचा एक विश्वास आहे. हा बिल्डथॉन फक्त एक स्पर्धा नाही, तर एक चळवळ आहे, विचार करण्याची निर्माण करण्याची आणि सक्षम भारतासाठी उपाय शोधण्याची. यामध्ये तुम्ही 4 मुख्य विषयांचा शोध घेऊ शकता. आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल, समृद्ध भारत यातून आपण राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या भावना जिवंत करतो. मी देशातील विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय चळवळीचा भाग होण्यासाठी आमंत्रित करतो. तुमची एक आयडिया क्लासरूमला प्रकाश देऊ शकते किंवा समाजाला बदलू शकते. यासाठी vbb.mic.gov.in वर नोंदणी करा. याद्वारे जगाला भारताची तादक पाहू द्या.
