AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन तास डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता, संपूर्ण कुटुंबच अडकलं होतं, जीव वाचल्यावर सांगितली आपबीती

सर्व कुटुंब ननीन गाडी पाहण्यासाठी गेले होते. गाडी पाहून पहिल्या मजल्यावर घरी जाण्यासाठी सर्व जण लिफ्टमध्ये शिरले. पण लिफ्ट बंद पडली आणि सर्वजण आत अडकले.

दोन तास डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता, संपूर्ण कुटुंबच अडकलं होतं, जीव वाचल्यावर सांगितली आपबीती
लिफ्टमध्ये एकाच कुटुंबातील आठ जण अडकलेImage Credit source: TV9
| Updated on: Apr 14, 2023 | 4:34 PM
Share

नोएडा : ग्रेटर नोएडात काळजात धस्स करणारी घटना उघडकीस आली आहे. ग्रेटर नोएडाच्या अल्फा-2 सेक्टरच्या गोल्फ गार्डनिया सोसायटीत रात्री उशिरा लिफ्टमध्ये 8 लोक अचानक पहिल्या मजल्यावर अडकल्याची घटना घडली. अडकलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले होती. तब्बल दोन तास लिफ्टमध्ये संपूर्ण कुटुंब जीवन मरणाच्या दारात उभे होते. मात्र अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नाने दोन तासानंतर कुटुंबाची लिफ्टमधून सुटका केली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले अन् लिफ्ट बंद झाली

गोल्फ गार्डनिया सोसायटीत दुष्यंत कुमार काल रात्री उशिरा आपल्या ओळखीच्या व्यक्तीची नवीन गाडी पहायला गेले होते. गाडी पाहून कुटुंबासह पहिल्या मजल्यावरील आपल्या घरी चालले होते. यासाठी ते इमारतीतील लिफ्टमध्ये शिरले, मात्र लिफ्ट वर न जाता मायनस पहिल्या मजल्यावर थांबली. यानंतर दुष्यंत कुमार यांनी बटण दाबून लिफ्ट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु लिफ्ट सुरु न झाल्याने 112 आपत्कालीन क्रमांकावर कॉल करण्यात आला. लिफ्टचा सायरनही बंद पडला होता.

अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नांनी कुटुंबाची सुटका केली

सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी खूप कसरत केली. मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत लोखंडी रॉडच्या सहाय्याने दोन तास अथक प्रयत्न करुन अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

अडकलेल्यां लोकांमध्ये 2 लहान मुले आणि एका वृद्धाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्यावर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडली असून, याबाबत बांधकाम व्यावसायिक आणि देखभाल कर्मचारी मात्र मौन बाळगून आहेत.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.