AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Pradhan: बंगालमधील निवडणूक लोकांच्या हातात, सत्ता परिवर्तन होणार? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले काय?

Dharmendra Pradhan on West Bengal Election: पश्चिम बंगालचा गड जिंकण्यासाठी भाजप गेल्या पाच वर्षांपासून जोरात तयारी करत आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी काय विश्वास व्यक्त केला आहे.

Dharmendra Pradhan: बंगालमधील निवडणूक लोकांच्या हातात, सत्ता परिवर्तन होणार? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले काय?
| Updated on: Apr 05, 2026 | 3:53 PM
Share

Dharmendra Pradhan on West Bengal Election: पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी भाजप आसूसलेली आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून भाजपने तयारी सुरू केलेली आहे. आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळम या राज्यात निवडणुकीचा बार उडालेला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होत आहे. त्यापूर्वीच भाजप नेत्यांची थेट विधानं समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारविरोधात केंद्र सरकार असा संघर्ष गेल्या काही महिन्यात शिगेला पोहचला आहे. त्यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी काय विश्वास व्यक्त केला आहे.

बंगालची निवडणूक लोकांच्या हाती

पश्चिम बंगालमधील झारग्राममध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं वक्तव्य केलं. यावेळी बंगालमधील जनताच स्वतः निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी प्रदेशातील जनता भ्रष्टाचार, घराणेशाही आणि दडपशाही विरोधात निर्णायक मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भयमुक्त आणि महिलांवरील अत्याचारमुक्त बंगालची आता गरज असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगाल सरकार हे जनतेचे हितैषी नाही तर स्वतःच्या हिताचे काम करत असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी सुवेंद्रू अधिकारी, समीक भट्टाचार्य आणि दिलीप घोष यांची नावं घेत, ही बंगाल बाहेरील मंडळी आहेत का, असा सवाल प्रधान यांनी केला. यावेळी बंगालच्या जनतेने ठरवले आहे, भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मालदा घटनेवर संताप

पश्चिम बंगालमधील मालदा येथे सात न्यायिक अधिकाऱ्यांना नऊ तासांहून अधिक काळ ओलीस ठेवण्यात आले होते. जमावाने त्यांना डांबून ठेवले होते. त्यावरून मोठे वादळ ओढले. मतदारांची नावं वगळण्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांना ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यावर भाजपने कडाडून प्रहार केला. प्रधान यांनी ही घटना अपवादा‍त्मक म्हणता येणार नहाी. या अधिकाऱ्यांना अन्न आणि पाणीही नाकारण्यात आले. मालदा-मुर्शिदाबामध्ये हिंसक कारवाया वाढल्या आहेत. हिंदू कुंटुंबावर अत्याचार, हरगोबिंदो व चंदन दास यांची निर्घृण हत्या याला पश्चिम बंगाल सरकारचे अभय असल्याचा गंभीर आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात निवडणुकीपूर्वीच अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे.

Follow Us
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदेंचा बड्या नेत्यासोबत
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदेंचा बड्या नेत्यासोबत एकाच गाडीतून प्रवास, तब्बल 30 मिनिटांच्या चर्चेत...
शिंदेंच्या नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या! कल्याणमधील डॉक्टारांच्या मारहाण
शिंदेंच्या नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या! कल्याणमधील डॉक्टारांच्या मारहाण प्रकरणात मोठ ट्वीस्ट, थेट...
समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा...
समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा; पुढील 6 महिन्यात...
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार; पंढरपूरकडे पालखीचे भव्य प्रस्थान
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य...
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य हिंदीत उच्चारल्याबद्दल राज ठाकरे कडाडले