"जुबी, न घाबरता सरेंडर कर बेटा" आईची विनवणी जुमानली नाही, तिघा दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान

'जुबी, घाबरु नको, बाहेर ये, तुला काही होणार नाही. फक्त हातातील शस्त्र खाली टाकून बाहेर ये' असा संवाद जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बराचवेळ ऐकायला मिळाला (Encounter of terrorist in Srinagar).

"जुबी, न घाबरता सरेंडर कर बेटा" आईची विनवणी जुमानली नाही, तिघा दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान

श्रीनगर : ‘जुबी, घाबरु नको, बाहेर ये, तुला काही होणार नाही. फक्त हातातील शस्त्र खाली टाकून बाहेर ये‘ असा संवाद जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बराचवेळ ऐकायला मिळाला (Encounter of terrorist in Srinagar). सुरक्षा रक्षकांनी श्रीनगरच्या पंथा चौकात सुरक्षा दलावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यासाठी आई-वडिलांना पाचारण केलं. त्यांच्या आई वडिलांनी अगदी विनवणी करुन त्यांना शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. मात्र, तरीही फुटीरतावादाच्या प्रचाराला बळी पडलेल्या हल्लेखोरांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. अखेर सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत तीन जण ठार झाले.

जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक तरुण नेहमीच फुटीरतावाद्यांच्या प्रचाराला बळी पडताना दिसून आले आहेत. आता पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये असंच एक उदाहरण समोर आलं. श्रीनगरच्या पंथा चौकात 3 तरुणांनी दहशतवाद्यांसोबत मिळून दुचाकीवरुन सीआरपीएफच्या एका तुकडीवर हल्ला केला. यानंतर सुरक्षा दलाने त्यांना वाचवण्यासाठी संधी देत त्यांच्या आई वडिलांना मुलांना शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. मात्र, दहशतवादाच्या मार्गावरील या तरुणांनी आत्मसमर्पण न केल्याने चकमकीत ते मारले गेले.

चकमकीत मारले गेलेल्यांमध्ये शाकिब अहमद, उमर तारीक भट्ट, जुबेर अहमद शेख यांचा समावेश आहे. यातील शाकिब सक्रिय दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे. इतर दोघे त्याची मदत करत असल्याचा आरोप आहे. एन्काउंटरआधी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

ज़ुबेरच्या आईने त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी अगदी विनवणी केली. त्या म्हणाल्या, “जुबी बाहेर ये. मी तुझी आई आहे. तू बाहेर ये. मी बाहेरच आहे. तू बाहेर ये, घाबरु नको.” यावेळी सुरक्षा रक्षकांनी जुबेरच्या आईला सुरक्षा दल काहीही करणार नाही. शस्त्रास्त्र खाली टाकून बाहेर येण्याचं आवाहन करण्यास सांगितलं. यानंतर जुबेरच्या आईने त्या प्रमाणे आवाहन केलं. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

यातील दुसरा एक हल्लेखोर उमरच्या वडिलांनी देखील त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले. ते म्हणाले, “तू बाहेर ये. तुझ्यासोबत कुणी काहीही वाईट करणार नाही. तुम्ही लोक बाहेर या, आम्ही बाहेर वाट पाहतो आहे. तुमच्या आई अगदी मरायला तयार आहेत. आमच्यावर उपकार करा, पण बाहेर या. मी तुला लहानाचं मोठं केलंय, इथपर्यंत आणलंय. माझं ऐक बाहेर ये. आम्ही वाट पाहतो आहे, बाहेर या. तुम्ही आत्मसमर्पण करा हे लोक तुम्हाला काहीही करणार नाही.”

सुरक्षा दलाने उमरच्या वडिलांना देखील त्यांना हत्यार खाली टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, हल्लेखोरांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचंही ऐकलं नाही. यावेळी उमरच्या वडिलांनी तू फक्त फिरु येतो म्हणाला, मग नमाजालाही गेला. मग त्या वाटेला का गेलास? असा उद्विग्न प्रश्नही विचारला. अखेर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

ईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

हत्येनंतर जाळण्यासाठी घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह रचले, चौकशीत गँगस्टर दुबेची कबुली

माझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

Encounter of terrorist in Srinagar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *