आजही भारत ‘या’ एका गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून, प्रत्येक भारतीय कुटुंबात दररोज होतो वापर
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. आयात -निर्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील दबाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार बंद झाला आहे. या मार्गानं भारताचा पाकिस्तानसोबत व्यापार सुरू होता. भारतातून पाकिस्तानला सोयाबीन, पोल्ट्री फीड, भाजीपाला, लाल मिर्ची, प्लास्टिकचे दाने आणि विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू निर्यात केल्या जात होत्या तर पाकिस्तानमधून सुखा मेवा, खजूर, जिप्सम, सीमेंट, काच आणि सैंधव मीठ यासारख्या वस्तू आयात केल्या जात होत्या. मात्र आता आयात-निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे.
भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, मात्र विकासाच्या बाबतीमध्ये भारत पाकिस्तानच्या खूप पुढे निघून गेला. भारत आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्वावलंबी बनला आहे, तर पाकिस्तानला मात्र आजही अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबू राहवं लागत आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे, की ज्यासाठी आजही भारत पाकिस्तानवर पूर्णपणे अवलंबू आहे.ती गोष्ट म्हणजे सैंधव मीठ, सैंधव मिठाचा जवळपास सर्वच पुरवठा भारताला पाकिस्तानमधून होतो.
सैंधव मिळाला रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ, गुलाबी मीठ, हिमालयीन मीठ अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. भारतामध्ये वेगवेगळ्या व्रत आणि सणोत्सवांमध्ये तसेच उपवासासाठी या मिठाचा वापर केला जातो. कारण या मिठाला शुद्ध मीठ मानलं जातं. त्यामुळे या मिठाची भारतात मोठी मागणी आहे. परंतु मागणी असताना देखील या मिठाचं उत्पादन भारतामध्ये फारच थोड्याप्रमाणात होतं. त्यामुळे या मिठासाठी आपण पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहोत. पाकिस्तानमध्ये या मिठाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं.
पाकिस्तानच्या पंजबा प्रांतामध्ये या मिठाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. पंजाबच्या झेलम जिल्ह्यात खेवडा नावाची मिठाची खान ही जगातील दुसऱ्या नंबरची सैंधव मीठाची मोठी खान आहे, त्यामुळे पाकिस्तानमध्ये या मिठाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. मात्र आता आयात बंद असल्यामुळे या मिठाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.
