AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS पूजा खेडकरनंतर आणखी एक आयएएसचा वाद चर्चेत, जिम-डान्स व्हिडिओनंतर अपंगत्व कोट्यातून निवडीवर प्रश्न?

अभिषेक सिंहने यांनी यूजला उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, मला कोणत्याही टीकेचा त्रास होत नाही. पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा मी माझ्या टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहे. कारण माझे हजारो समर्थक मला प्रत्युत्तर देण्यास सांगत आहेत. अन्यथा आमचे मनोधैर्य खचले जाईल.

IAS पूजा खेडकरनंतर आणखी एक आयएएसचा वाद चर्चेत, जिम-डान्स व्हिडिओनंतर अपंगत्व कोट्यातून निवडीवर प्रश्न?
पूजा खेडकर, अभिषेक सिंह
| Updated on: Jul 15, 2024 | 2:18 PM
Share

पुणे येथील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आली आहे. अधिकार नसताना मागितलेली गाडी, कॅबिन या चर्चेनंतर पूजा खेडकर यांची यूपीएससीमधील निवड वादात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा विषय समोर आला आहे. त्याचवेळी आणखी एक आयएएस अधिकारी अभिषेक सिंह वादात आले आहे. अभिषेक सिंह यांनी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. 2011 मधील आयएएस अधिकारी असलेल्या अभिषेक सिंह यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये राजीनामा दिला होता.

कोण आहे अभिषेक सिंह

अभिषेक सिंह यांची संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अपंग कोट्यातून निवड झाली होती. त्यांनी लोकोमोटिव डिसऑर्डर असल्याचे म्हटले होते. अभिषेक यांनी एक्टिंग करिअरसाठी आयएएसचा राजीनामा दिला. सोशल मीडियावर त्यांचे जिम वर्कआउट आणि डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या अपंगत्वाच्या आरक्षणातून झालेल्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यावर अभिषेक यांनी उत्तरही दिले आहे. आपल्या विरोधात प्रोपेगेंडा चलवला जात असून तो बंद केला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

अभिषेक यांच्या व्हिडिओनंतर वाद

वर्ष 2011 बॅचचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी पूजा खेडकर प्रकरणात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी प्रशासकीय निवडण प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडिया यूजर्सकडून त्यांच्याच निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांनीही यूपीएससीकडे बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. एका युजरने म्हटले की, डान्स करणारे अभिषेक यांनी लोकोमोटर डिसेबिलिटी (PwBD-3) कॅटेगरीतून यूपीएससी उत्तीर्ण केली. रोशन राय नावाच्या यूजरने म्हटले, अपंग असताना IAS बनल्यानंतर जिममध्ये वजन उचलत आहे? थोडे असे ज्ञान आम्हालाही द्या. काहींनी अभिषेकच्या निवडीमागे वडिलांचा हात असल्याचे म्हटले.

अभिषेक यांनी दिले उत्तर

अभिषेक सिंहने यांनी यूजला उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, मला कोणत्याही टीकेचा त्रास होत नाही. पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा मी माझ्या टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहे. कारण माझे हजारो समर्थक मला प्रत्युत्तर देण्यास सांगत आहेत. अन्यथा आमचे मनोधैर्य खचले जाईल. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून सत्य मांडणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे हे उत्तर माझ्या समीक्षकांना नाही तर माझ्या समर्थकांना समर्पित आहे. माझे वडील आयपीएस नव्हते. संपूर्ण परिवारात मी एकटा आयएएस आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.