AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रशियाचा भारताला मोठा हादरा, पुतिन यांच्या घोषणेमुळे खळबळ, मित्रालाच दिला धोका

कच्च्या तेलाच्या किंमती वाढवून आधीच रशियानं भारताला एक मोठा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर आता रशियानं असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारत मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! रशियाचा भारताला मोठा हादरा, पुतिन यांच्या घोषणेमुळे खळबळ, मित्रालाच दिला धोका
Vladimir PutinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 7:13 PM
Share

इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद केला आहे. स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद असल्यामुळे कच्च तेल आणि नॅचरल गॅसची वाहतूक करणारे अनेक जहाजं सध्या या सामुद्रधुनीमध्ये अडकून पडली आहेत. इराणने भारताचे काही जहाजं या मार्गाने जरी जाऊ दिले असले तरी देखील सामान्य परिस्थितीच्या मानाने ही जहाजांची आवक खूपच कमी आहे. या मार्गाने आपल्या एकूण गरजेपैकी भारत सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. मात्र हा मार्ग बंद असल्यामुळे भारतात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. ऊर्जा संकट दूर करण्यासाठी भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तेल खरेदीमध्ये रशियानं भारताला मोठा झटका दिला होता. युद्ध सुरू होण्यापूर्वी रशिया भारताला सवलतीच्या दरात कच्चं तेल निर्यात करत होता, मात्र जसं युद्ध सुरू झालं तसं रशियानं आपल्या कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ केली आहे, रशियानं भारताला सवलतीच्या दरात कच्चं तेल विक्री करण्यास नकार दिला आहे. मात्र दुसरीकडे रशिया पाकिस्तानला स्वस्त दरात कच्चं तेल उपलब्ध करू देत असल्याचं समोर आलं आहे.

हे सर्व सुरू असतानाच आता रशियानं भारताला दुसरा मोठा झटका दिला आहे. तो म्हणजे देशांतर्गत मागणीला प्राथमिकता देत एक महिन्यासाठी रशियानं भारताला सुरू असलेली खतांची निर्यात थांबवली आहे. यामुळे आता भारताच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करतो, भारत हा रशियाचा सर्वात मोठा खतांचा आयातदार देश आहे. 2025 मध्ये रशियानं भारताला तब्बल 25 लाख टन खताचा पुरवठा केला होता. मात्र आता रशियानं अचानक खतांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्यानं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करतो. एका रिपोर्टनुसार 2025 मध्ये रशियानं भारताला तब्बल 25 लाख टन खताचा पुरवठा केला होता. यावर्षी त्यामध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच भारताला जेवढी एकूण खतांची जेवढी गरज आहे, त्यातील तब्बल 33 टक्के खतांचा पुरवठा एकटा रशिया भारताला करत आहे. मात्र आता रशियान आपल्या देशांतर्गत गरजेला प्राथमिकता देत भारताला एक महिन्यासाठी खतांचा पुरवठा बंद केला आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!