AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारतानं पाकिस्तानचे दोन दावे अन् एक मागणी फेटाळली

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर परराष्ट्र मंत्रालयाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत.

मोठी बातमी! भारतानं पाकिस्तानचे दोन दावे अन् एक मागणी फेटाळली
| Updated on: May 08, 2025 | 6:37 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान ऑपरेश सिंदूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे भारतानं फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानची मागणी देखील फेटाळून लावली आहे.

काय आहे पाकिस्तानचा दावा?   

भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये आमचे 26 नागरिक मारले गेले आणि 46 जण जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता, तसेच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचं देखील पाकिस्तानने म्हटलं होतं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करा अशी मागणी देखील पाकिस्तानने केली होती, मात्र ही मागणी आणि दावे भारतानं फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय म्हणाले विक्रम मिसरी?   

 7 तारखेच्या स्ट्राईकमध्ये नागरिक मारल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जातं. पण आम्ही टार्गेट ठेवून हल्ला केला होता. काल दहशतवाद्यांचा दफनविधी होता. त्यात कोणताही सिव्हिलियन मारला गेला नसल्याचं स्पष्ट होतं. माझ्या हातात फोटो आहे. त्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. पाकिस्तानी ध्वज आहेत. मारलेल्या दहशतवाद्यांना स्टेट हॉनर दिला गेला याचं मला आश्यर्य वाटलं.

भारताने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानचा हा दावा चुकीचा आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला केला आहे. दुर्देवाने पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी  धार्मिक स्थळांचा सहारा घेत आहे, असं मिसरी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संयुक्त चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली होती, मात्र ती मागणी देखील भारतानं फेटाळून लावली आहे, 26/11 आणि पठाण कोट हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊन देखील पाकिस्तानचं अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?