AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest: सिंघू सीमेवर शेतकऱ्याची आत्महत्या; 26 नोव्हेंबरचं दिलं आंदोलकांनी अल्टिमेटम

पंजाबमधील सिंघू सीमेवर (Punjab Singhu Border) शेतकरी आंदोलनाच्या स्थळी एका 45 वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी आत्महत्या केली. (Farmer suicide) एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत तो शेतकरी आढळला. 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे.

Farmers Protest: सिंघू सीमेवर शेतकऱ्याची आत्महत्या; 26 नोव्हेंबरचं दिलं आंदोलकांनी अल्टिमेटम
Rakesh Tikait, Farmers protest
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 5:39 PM
Share

नवी दिल्लीः  पंजाबमधील सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या स्थळी एका 45 वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत तो शेतकरी आढळला. मिळालेल्या माहितीनुसार गुरप्रीत सिंग असे मृताचे नाव असून तो पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील अमरोह जिल्ह्यातील रहिवासी होता. तो भारतीय किसान युनियन (BKU) एकता शी संबंधित होता. 2020 च्या तीन शेती कायद्यांविरोधात उत्तर भारतात शेतकरी आंदोलन करतायेत. (Farmer commits suicide Farmer protestors give ultimatun of Novernber 26)

शेती सुधारणा कायदा 2020 मागे घ्यावा आणि पिकांना किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी नवीन कायदा करावा सासारख्या मागण्याघेऊन शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागच्या वर्षीपासून तळ ठोकून आहेत. शेतकर्‍यांशी केंद्राच्या आतापर्यंत 11 औपचारिक बौठका झालेल्या आहेत, मात्र, केंद्राने नवीन कायदे शेतकरी हिताचे असल्याचे ठाम आहे.

26 नोव्हेंबरचं अल्टिमेटम

26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 26 नोव्हेंबर दिल्लीच्या सीमेवर मोठ्या सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्याच दिवशी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानपासून दिल्लीपर्यंत सर्व आघाड्यांवर प्रचंड जनसमुदाय जमा केला जाईल आणि मोठे मेळावे घेतले जातील. 26  नोव्हेंबर हा संविधान दिनही आहे. 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर असलेल्या सर्व राज्यांच्या राजधानीत शेतकरी एकत्र येणार आसल्याचं सांगणायेत येतय.

29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना दररोज 500 ट्रॅक्टर शेतकरी संसदेकडे कूच करणार आहेत. सिंगू सीमेवर मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.

Other News

Afghanistan Crisis: NSA ची दिल्लीत बैठक, सात देश सहभागी; “मला विश्वास आहे फगानिस्तानच्या लोकांना मदत होईल”- अजीत डोभाल

टँकर-बसचा भीषण अपघात; 12 ठार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.