टँकर-बसचा भीषण अपघात; 12 ठार

टँकर-बसचा भीषण अपघात; 12 ठार

बाडमेर - जोधपूर हायवेवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Nov 10, 2021 | 2:54 PM

बाडमेर – बाडमेर – जोधपूर हायवेवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव टँकर बसला समोरून धडकले, या अपघातानंतर बसला आग लागली. आगीमध्ये 12 लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बसमध्ये 25 लोक होते. राँगसाईडने येत असलेले भरधाव टॅंकर बसला समोरून धडकले. या अपघातानंतर बसला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. यातील 13 प्रवाशांना वाचवण्यात यश आले तर 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती 

दरम्यान जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चितांजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी वर्तवली आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

संबंधित बातम्या

कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करावा; पाकिस्तानची भारताला विनंती

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; 36 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें