कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करावा; पाकिस्तानची भारताला विनंती

कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करावा; पाकिस्तानची भारताला विनंती

भारताने पुन्हा एकदा आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर खूला करावा असे आवाहन पाकिस्तानने भारताला केले आहे. कर्तारपूर हे शिख धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे, त्यांना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त कर्तारपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी असे पाकिस्तानने म्हटले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Nov 10, 2021 | 7:21 AM

नवी दिल्ली – भारताने पुन्हा एकदा आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर खूला करावा असे आवाहन पाकिस्तानने भारताला केले आहे. कर्तारपूर हे शिख धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे, त्यांना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त कर्तारपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी असे पाकिस्तानने म्हटले आहे. याबाबत पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी 9 नोव्हेबंर 2019 मध्ये गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारतातील शिख बांधवांना पवित्र स्थळ असलेल्या कर्तारपूरला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने हा मार्ग बंद कण्यात आला.

पाक भाविकांचे स्वागत करण्यास उत्सूक 

याबाबत बोलताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत भारताने आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू केलेला नाही. कर्तारपूरमध्ये गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त येत्या 17 ते 26 नोव्हेंबरदरम्यान मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करून शिख बांधवांना कर्तारपूरमध्ये येण्याची परवानगी द्यावी. पाकिस्तान येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.

सिद्धू यांची गुरुदासपूरला भेट 

त्यापूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू  यांनी मंगळवारी पंजाबस्थित नमध्ये असलेल्या डेरा बाबा नानकला भेट दिली. त्यांनी भारत पाक सीमेवरूनच पाकिस्तानमध्ये असलेल्या कर्तारपूर साहिबचे दर्शन घेत, प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर बोलताना ते म्हणाले की, आता दोनही देशांनी कर्तारपूर कॉरिडॉर  पुन्हा एकदा सुरू करावा, ज्यामुळे शिख बांधवांना कर्तारपूरला जाऊन दर्शन घेता येईल. 

चन्नींनी देखील केली कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी देखील कर्तारपूर कॉरिडॉर भाविकांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीदरम्यान त्यांनी ही मागणी केली होती. कोरोनाच्या साथीपासून कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.

सबंधित बातम्या 

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; 36 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी

टेलर स्विफ्ट Twitter वर सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर तर सचिनची झाली एंट्री; बघा पुर्ण यादी

Covid Vaccine: WHO नंतर 96 देशांकडून Covaxin ला मान्यता – मनसुख मांडविया

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें