वर समोर येताच वधू बोलली ‘ते’ शब्द; ज्या मंडपात फुलं उधळले तिथेच वऱ्हाडांची लाठ्या -काठ्यानं मारहाण
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, नवरीने केलेल्या दाव्यानंतर दोन्ही कुटुंबात चांगलंच भांडण झालं, लाठ्या -काठ्यानं मारहाण देखील करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. भदोहीमध्ये एका कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. शेवटी लग्नाचा दिवस देखील आला. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री बॅण्ड बजासह वऱ्हाड देखील वधूच्या घरी दाखल झालं, सगंळ काही उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात सुरू होतं. मात्र असं काही घडलं, ज्यामुळे क्षणात सर्व बदललं, नवरीने लग्नाला नकार दिला. वर लग्नासाठी मंडपात आला, मात्र जेव्हा नवरीने त्याला पाहिलं तेव्हा तीने लग्नाला नकार दिला, मला ज्याचा फोटो दाखवण्यात आला, तो हा नाहीच असा आरोप तीने केला. त्यानंतर वर आणि वधुच्या कुटुंबात तब्बल दोन तास चर्चा झाली, मात्र नवरी लग्नाला तयार झाली नाही, त्यामुळे वराला लग्न न करताच घरी परतावं लागलं.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना भदोहीमधील एका गावात घडली आहे, शुक्रवारी रात्री वऱ्हाड नवरदेवासह वधूच्या घरी दाखल झालं. वधू पक्षानं देखील वर पक्षाचं जोरदार स्वागत केलं. त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली, त्यांच्या स्वागताला डिजे देखील लावण्यात आला. विवाहापूर्वी करण्यात येणारे सर्व कार्यक्रम सुरू होते, कुटुंबात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. अवघ्या काही वेळेत लग्न होणार होतं. मात्र वर मंडपात येताच मुलीनं लग्नाला नकार दिला. आपल्याला जो फोटो दाखवण्यात आला, तो हा मुलगा नाहीच असा दावा या मुलीनं केला आहे. त्यानंतर तिची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही कुटुंबात दोन तास चर्चा झाली, मात्र यावर मार्ग न निघाल्यानं अखेर वराला लग्न न करताच परत घरी यावं लागलं.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आपल्याला लग्नासाठी ज्या मुलाचा फोटो दाखवण्यात आला, तो हा मुलगा नाहीच असा दावा या तरुणीनं केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबात चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतर चर्चेच रूपांतर भांडणात झालं, दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला. त्यानंतर वर लग्न न करताच घरी परतला.