AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर रॉबर्ट वाड्रा राजकारणात; प्रियंका गांधींसोबत करणार काम, प्रियंका देशाचे भवितव्य असल्याचे प्रतिपादन

अखेर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती  रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे.

अखेर रॉबर्ट वाड्रा राजकारणात; प्रियंका गांधींसोबत करणार काम, प्रियंका देशाचे भवितव्य असल्याचे प्रतिपादन
रॉबर्ट वाड्रा
| Updated on: Apr 10, 2022 | 10:43 PM
Share

नवी दिल्ली : अखेर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती  रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. महाकालचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इंदूरमध्ये भाषण देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी  म्हटले आहे की आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहोत. प्रियंका गांधी या देशाचे भविष्य आहेत. आपण प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बाबत बोलताना प्रियंका गांधी यांनी सांगितले की, रॉबर्ट वाड्रा हे राजकारणात प्रवेश करणार असून, ते काँग्रेससाठी (Congress) काम करतील.

काय म्हणाले वाड्रा?

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करणार  असून, प्रियकां गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रियंका या देशाचे भवितव्य आहेत. आपण इथूनपुढे त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे वाड्रा यांनी म्हटले आहे. ते इंदुरमध्ये एका भाषणात बोलत होते.

महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. नुकत्याच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकला लागला या पाचही राज्यात काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र ती सत्ता टिकवण्यात देखील काँग्रेसला अपयश आले. पंजाबमध्ये पक्षाला अवघ्या आठरा जागांवर समाधान मानावे लागते. त्यामुळे आता पक्षांतर्गत हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची चिंतन बैठक देखील पार पडली होती. आता रॉबर्ट वाड्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाड्रा यांच्यावर पक्षातील एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

सोमय्यांसोबत खडसेंचं ये दोस्ती नहीं तोडेंगे, तर फडणवीसांना दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे…

Mumbai Police : गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, पवारांच्या घराबाहेरील राड्यानंतर मोठी कारवाई

पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान