देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन जेव्हा भाजी मंडईत जातात आणि भाजी खरेदी करतात तेव्हा..

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 09, 2022 | 2:05 PM

निर्मला सीतारमण यांनी चेन्नईतील मायलापुर भाजी मंडईत जाऊन हातात टोपली घेऊन भाजी घेण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन जेव्हा भाजी मंडईत जातात आणि भाजी खरेदी करतात तेव्हा..
Image Credit source: Social Media

चेन्नई : देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या कार्यालयाकडून नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहे. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चेन्नईच्या मायलापुर येथील भाजीमंडईत (Vegetable Market) जात भाज्या खरेदी करतांना दिसून येत आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. रात्रीच्या वेळी मायलापुर येथील भाजी मंडईत गेल्याचे दिसून आले आहे. तिथे त्यांनी भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद देखील साधला आहे.भाजी विक्रेत्या महिलांना थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमन आल्याचे पाहून मोठा आनंद झाला होता. नागरिक त्यांना नमस्कार करत होते त्यावेळी निर्मला सीतारमन देखील त्यांना नमस्कार करत आभार मानत होत्या.

निर्मला सीतारमण यांनी चेन्नईतील मायलापुर भाजी मंडईत जाऊन हातात टोपली घेऊन भाजी घेण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन या स्वतः भाजी घ्यायला आल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्य वाटले असावे, म्हणून नागरिक जवळयेऊन सीतारमन यांना नमस्कार करत होते.

हे सुद्धा वाचा

खरंतर मागील काही दिवसांपूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण बघता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर टीका होत होती.

याचदरम्यान अर्थमंत्री यांनी इतर देशांच्या तुलनेत रुपया चांगल्या स्थितीत असल्याचे म्हणत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण न झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

एकूणच निर्मला सीतारमण यांनी भाजी मंडईत जाऊन महिलांना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का ? की भाजी मंडईत रोष आहे का ? याची चाचपणी केली ? अशा विविध प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI