‘इंडियन कोरोना’ म्हणणं भोवलं; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (FIR against Kamal Nath for allegedly creating panic through remarks on Covid-19)

'इंडियन कोरोना' म्हणणं भोवलं; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर
kamal nath
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 10:44 AM

भोपाळ: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. (FIR against Kamal Nath for allegedly creating panic through remarks on Covid-19)

भाजपने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपवर टीका केली होती. आता कोरोनाला जगात ‘इंडियन कोरोना’ नावाने ओळखले जाईल, असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपाहार्य असल्याचं भाजपने म्हटलं आहे. भाजपने रविवारी दुपारी हे निवेदन गुन्हे अन्वेषण विभागाला दिलं होतं. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने संध्याकाळी कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ही दोन्ही कलमे जामीनपात्रं आहेत.

कमलनाथ नेमकं काय म्हणाले?

कमलनाथ यांनी उज्जैनमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. जानेवारी 2020मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला चायनीज कोरोना म्हटलं गेलं. चीनच्या लॅबमध्ये हा कोरोना तयार झाला आणि एका शहरातून हा कोरोना आला. आज आपण कुठे पोहोचलो आहोत? ‘इंडियन कोरोना’ येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणं टाळलं आहे. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक ‘इंडियन कोरोना’ घेऊन येतील म्हणून त्यांना तिथेच रोखून ठेवलं आहे. जगभरात देश यामुळे ओळखला जात आहे. आता आपला देश महान राहिला नाही. आता भारत कोविडचा बनलेला आहे, असं ते म्हणाले होते.

पात्रांनाही नोटीस

यापूर्वी टुलकिट प्रकरणी भाजप नेते संबित पात्रा यांना रायपूर पोलिसांनी नोटीस पाठवली होती. संबित पात्रा यांना चौकशीसाठी बोलावण्याकरिता ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आकाश शर्मा यांनीही तक्रार दाखल केली आहे. (FIR against Kamal Nath for allegedly creating panic through remarks on Covid-19)

संबंधित बातम्या:

Corona Cases in India | देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार, एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू

Covid-19 Vaccine: जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल

आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे

(FIR against Kamal Nath for allegedly creating panic through remarks on Covid-19)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.