काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (Former Union minister Buta Singh passes away)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं निधन
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 11:19 AM

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. (Former Union minister Buta Singh passes away)

बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे आज शनिवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 21 मार्च 1934 मध्ये पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापूर गावात बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटा सिंग हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुटा सिंग काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहतानाच दलितांचे नेते म्हणूनही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली होती. ते 1978 ते 1980 या काळात काँग्रेसचे महासचिव होते. यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार येताच त्यांना बिहारचे राज्यपाल करण्यात आले होते.

बुटा सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

दलितांचा आवाज गमावला: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरदार बुटा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बुटा सिंग हे अनुभवी प्रशासक होते. दलित आणि गरीबांचा आवाज होते. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख वाटलं. बुटा सिंग यांच्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना आहेत, असं मोदी यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

मोदींनी उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जातून 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20 हजार मिळाले असते: राहुल गांधी

LIVE: केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 7 वी बैठक संपली, अद्यापही तोडगा नाहीच

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.