औरंगजेब तर काहीच नाही, हे आहेत इतिहासातील सर्वात क्रूर शासक; नुसतं नाव ऐकलं तर आजही उडतो थरकाप
विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे, छावा चित्रपटाने अनेक नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटामध्ये मुघल शासक औरंगजेबाची क्रूरता पाहून अंगावर काटा येतो.

विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे, छावा चित्रपटाने अनेक नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटामध्ये मुघल शासक औरंगजेबाची क्रूरता पाहून अंगावर काटा येतो. भारतामध्ये जे काही राजे होऊन गेले त्यापैकी सर्वात क्रूर राजा असा जर औरंगजेबाचा उल्लेख केला तर चुकीचं ठरणार नाही. मात्र जगामध्ये असेही चार राजे होऊन गेले जे औरंगजेबापेक्षाही भयानक क्रूर होते. या यादीमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या राजांनी त्यांच्या काळात एवढा उच्छाद मांडला होता की, क्रूरतेच्या सर्व परिसीमा पार केल्या होत्या. आज आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत.
अतिला हून – अतिला हून हा एवढा क्रूर राजा होता की त्याचा उल्लेख ‘सुलतानी संकट’ असा केला जायचा.ईसवीसन 434-453 या काळात त्याचं राज्य होतं.सत्ता मिळवण्यासाठी त्याने आपलाच भाऊ ब्लेडा याची हत्या केली. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार जर्मनी, बाल्कन आणि रशियामध्ये केला. त्याच्या राज्यामध्ये छोट्याशा चुकीला देखील माफी नव्हती, थेट मृत्यू दंड दिला जात होता. असं म्हटलं जातं की लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याचा गूढ मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याची कबर जिथे खोदली ते स्थान देखील गुप्त ठेवलं.
रोमन सम्राट कैलीगुला – कैलीगुला हा एक रोमन सम्राट होता, त्याने केवळ चार वर्षच राज्य केलं. मात्र क्रूरता आणि आपल्या लहरी स्वभावामुळे तो जगभरात बदनाम झाला. त्याने सुरुवातीला आपल्या राज्यात काही सुधारना देखील केल्या, मात्र त्यानंतर त्याच्या लहरी स्वाभावामुळे तो अत्याचारी बनला. त्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. त्याने या चार वर्षांमध्ये आपल्या प्रजेवर प्रचंड अत्याचार केले. बलात्कार, फाशी, आपल्याच प्रजेची लूट असे अनेक अत्याचार त्याने केले. मात्र त्याला मानसिक आजारानं ग्रासलं, त्यानंतर त्याने आत्महत्या केली.
इवान द टेरिबल – याच्या नावातच टेरिबल आहे, इवान द टेरिबल ज्याचं खरं नाव इवान IV वासिलीविच होतं. 1547 ते 1584 असा त्याचा शासनकाळ होता. 1560 साली त्याच्या बायकोचा मृत्यू झाला. आपल्या बायकोच्या मृत्यूनंतर तो वेडा झाला होता. त्याच्यानंतर त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर विषप्रयोग केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा राजा इतका क्रूर होता की त्याने त्या काळात अनेक पुजार्यांची हत्या केली, थोडी जरी चूक झाली तर तो आपल्या अधिकार्यांना जिवंत जाळत होता, असं म्हणतात.
रानी मॅरी प्रथम –रानी मॅरी ही राजा हेनरी आष्टम आणि कॅथरीन ऑफ एरागॉन यांची एकुलती एक मुलगी होती. 1553 साली ती इंग्लंडची रानी बनली, तीने आपल्या काळात विरोधकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. अनेकांना सूळावर चढवलं. भयंकर नरसंहार केला, त्यामुळे तिला ब्लडी मॅरी असं देखील म्हणत.
